सुशांतच्या बहिणीने शेअर केली त्याची शेवटची पोस्ट, चाहते झाले भावूक!

भावाची शेवटची पोस्ट…तुला यापुढे कधी बघता येणार नाही हा विचार करूनच खूप त्रास होतोय…हे दुःख तुकड्यांमध्ये कसं आपल्याला विखरवू शकतं…

  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता १० महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण त्याचे चाहते आणि कुटुंबिय या दुःखातून सावरलेले नाहीत. सुशांतच्या बहिणीने नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यात सुशांतने मृत्यूच्या आधी शेवटच्या पोस्टचा स्क्रीनशॉट तिने पोस्ट केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करताना बहिण श्वेता सिंह किर्तीने इमोशनल पोस्ट लिहीलीय.

  श्वेता सिंह किर्ती म्हणाली, “भावाची शेवटची पोस्ट…तुला यापुढे कधी बघता येणार नाही हा विचार करूनच खूप त्रास होतोय…हे दुःख तुकड्यांमध्ये कसं आपल्याला विखरवू शकतं… आपण या तुकड्यांना एकत्र करायला जावू, जमा करालया जावू, तेव्हा आपल्याला कळतं की हे शक्य नाही…”

   

  मृत्यूच्या काही दिवसांपुर्वी शेअर केलेला आईसोबतचा फोटो

  सुशांतने त्याच्या मृत्यूच्या एक आठवड्यापुर्वीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘माँ’ असं लिहिलं होतं. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘भूतकाळाच्या आठवणी अंश्रूवाटे वाहत आहेत. अपूर्ण स्वप्न आणि उद्याची आशा या दोघांमध्ये आयुष्य वाटाघाटी करत आहे. #आई’

  १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतच्या राहत्या घरी वांद्रे येथे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह अढळून आला. या प्रकरणाची ईडी चौकशी देखील झाली. या प्रकरणाच ड्रग्स कनेक्शन असल्याचं देखील समोर आलं.