सुशांतच्या नातेवाईकांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस…

सुशांतच्या चुलत भावाचं नाव नीरज सिंग असं आहे. तुम्ही केलेल्या वक्तव्यांबद्दल ४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा नोटिसातून देण्यात आला आहे. संजय राऊत यांनी अलीकडेच शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सुशांतच्या वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडसोबतच आता राजकीय क्षेत्रांमध्ये सुद्धा आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. या प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील अनेक दावे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केलं असून त्यांचं दुसरं लग्न सुशांतला मान्य नव्हतं. असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सुशांतच्या चुलत भावाने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.   

सुशांतच्या चुलत भावाचं नाव नीरज सिंग असं आहे. तुम्ही केलेल्या वक्तव्यांबद्दल ४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा नोटिसातून देण्यात आला आहे.  संजय राऊत यांनी अलीकडेच शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सुशांतच्या वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केल्यामुळं सुशांत नाराज होता. वडिलांचं दुसरं लग्न मान्य नसल्यामुळं त्यांच्यात तणाव होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर येऊ नये म्हणून यावर राजकारण करण्यात आलं आणि मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं, असा आरोपही त्यांनी केला होता. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे खासदार संजय राऊत यांना या प्रकरणी नीरज सिंगने नोटीस पाठवली आहे.