hritik roshan

सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वेगळ्याच लूकमध्ये दिसून आली. बॉडीकॉन टॉप सोबतच स्प्लिट हाय थाय स्कर्ट, हाय हील्स मध्ये खूपच ग्लॅमरस दिसून येतेय.

  बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खान तिच्या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. आता सुझान खान सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आलीय. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला पाहून तिने स्वतःचा मेकओव्हर केला की काय असंच दिसून येतंय. या व्हिडीओमधल्या तिच्या ग्लॅमरस लूकवर तिचे फॅन्स फिदा झाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sussanne Khan (@suzkr)

  सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वेगळ्याच लूकमध्ये दिसून आली. बॉडीकॉन टॉप सोबतच स्प्लिट हाय थाय स्कर्ट, हाय हील्स मध्ये खूपच ग्लॅमरस दिसून येतेय. या व्हिडीओला आतापर्यंत १४ हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sussanne Khan (@suzkr)

  अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांना बॉलिवूडमधल्या क्यूट कपलमध्ये पाहिलं जात होतं. या दोघांनी १४ वर्षाचा संसार केल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण तरीही ते दोघे त्यांची मुलं रेहान आणि रिदान यांच्यासाठी अनेकदा एकत्र आले आलेले दिसून आले. सुझान खान ही तिच्या स्टाइलीश अंदाजासाठी नेहमीच चर्चेत येत असते. सुझान खान ही बॉलिवूड अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. सुझान खान ही इंटेरिअर आणि फॅशन डिझायनर आहे. तिला स्वतःचे आऊटफिट्स स्वतःच डिझाइन करायला आवडतात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sussanne Khan (@suzkr)