samantar 2

‘समांतर’ वेबसिरीजच्या पहिल्या सिझनच्या अभूतपूर्व यशानंतर वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. या सिरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे जोरदार सुरू आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते. या वेब रीसीजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसले असतानाच निर्मात्यांनी मात्रदुसऱ्या सिझनमध्ये बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

‘समांतर’ वेबसिरीजच्या पहिल्या सिझनच्या अभूतपूर्व यशानंतर वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. या सिरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे जोरदार सुरू आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते. या वेब रीसीजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसले असतानाच निर्मात्यांनी मात्रदुसऱ्या सिझनमध्ये बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

‘समांतर’च्या पहिल्या सिझनला अर्थात पर्वाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ची (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अंड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)निर्मिती असलेल्या ‘समांतर’च्या पहिल्या सिझनला तब्बल २०० दशलक्ष हिट्स मिळाले होते आणि तो एक विक्रम मानला जातो.जगभरातील प्रेक्षकांना आता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा आहे. सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज भूमिकेत आहेत. स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्याच्या चाहत्यांना ती खूप आवडली होती. या सर्वच कारणांनी या वेब सिरीजबद्दलची रसिकांची प्रतीक्षा ताणली गेली आहे.

दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी,  तेजस्विनी पंडित आदी कलाकार सहभागी झाले होते. दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर यावेळी निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदारसुद्धा हजरहोते.या सर्वांनी दुसरे पर्व लवकरच दाखल करत असल्याचे म्हटले आणि ते पहिल्या सिझनप्रमाणेच अत्यंत लोकप्रिय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

‘समांतर’ या वेबसिरीजच्या माध्यमातून अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने वेब सिरीज क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘एमएक्स प्लेयर’च्या माध्यमातून ‘ओव्हर-द-टॉप’ व्यासपिठावरून ही मालिका प्रसारित झाली. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत.

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणाले, “समांतर’ ही आमची निर्मिती असलेली पहिली वेब सिरीज आहे. मराठी प्रेक्षक हा कथेच्या बाबतीत फार चोखंदळ असतो. सुहास शिरवळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकारलेल्या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज असल्याने ती रेसिकांना खूप आवडली. उत्तम कथेबरोबरच सकस अभिनय, तेवढेच ताकदीचे दिग्दर्शन आणि खिळवून ठेवणारी हाताळणी यामुळे वेब सिरीजच्या पहिल्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या पर्वतही आम्ही तेवढीच दर्जेदार हातळणी दिली असून काही नवीन पैलू त्यात दाखल केले आहेत. त्यामुळे प्रेक्षक या दुसऱ्या पर्वलासुद्धा तेवढेच डोक्यावर घेतील, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. आम्हाला यापुढेही अशाच आगळ्यावेगळ्या विषयांवर मालिका बनवायच्या आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.

सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज बेतली आहे. यातील कुमार महाजनला एके दिवशी कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी आधीच जागून गेला आहे. तो मग त्याच्या भविष्यामध्ये काय लिहिले आहे, याचा शोध घेवू लागतो.

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघेही त्यांनी साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकांसाठी घराघरात ओळखले जातात. नितीश यांनी बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये (१९८८) कृष्णाची भूमिका साकारली होती तर स्वप्निल जोशींनी रामानंद सागर यांच्या ‘कृष्ण’ (१९९३) मालिकेत ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या दोघांची मालिका म्हणूनही ‘समांतर’बद्दल रसिकांमध्ये कुतूहल आहे.