स्वप्नील जोशीच्या लाडक्या लेकीचा जबरदस्त डान्स बघून चाहते आणि कलाकार म्हणतात…

या गाण्यात ती क्रिती सेननसारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. एवढ्या लहान मुलीला या डान्स स्टेप्स फॉलो करताना पाहून स्वप्नील जोशीचे चाहते हैराण झाले आहेत. ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मायराचे कौतुक करत आहेत.

  मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता स्वप्नील जोशी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तो नेहमीच त्याचे अपडेट सोशल मीडियामार्फत चाहत्यांना देतो. पण आता त्याची मुलगी त्याच्या या अभिनयाला आणि डान्सला लवकर ओव्हर टेक करेल असं दिसतय. स्वप्नील जोशीची मुलगी मायरा चर्चेत आली आहे. स्वप्नील जोशीने नुकताच त्याची मुलगी मायरा हिचा एक डान्स व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याची मुलगी मायरा ही ‘कोका कोला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

  या गाण्यात ती क्रिती सेननसारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. एवढ्या लहान मुलीला या डान्स स्टेप्स फॉलो करताना पाहून स्वप्नील जोशीचे चाहते हैराण झाले आहेत. ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मायराचे कौतुक करत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

  तिच्या या व्हिडिओवर स्वप्नील जोशीचे अनेक चाहते तसेच कलाकार देखील कमेंटचा वर्षाव करत आहेत. यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने कमेंट केली आहे की, “अगं बाई किती गोड! खाऊ का मी तुला मायरा?” या सोबतच प्रार्थना बेहेरेने कमेंट केली आहे , “ओ सो क्यूट.” मायराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  स्वप्नील जोशीने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. ‘मितवा’, ‘तू ही रे’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘लाल इश्क’, ‘भिकारी’, ‘फुगे’ तसेच ‘मुंबई पुणे मुंबई’ यांसारख्या चित्रपटात उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

  Swapnil Joshi’s daughter Maayra Joshi dance on coca cola song