Tokyo Olympics: लव्हलिना बोर्गोहाइनने कांस्य पदक जिंकल्यावर तापसीने केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत!

३ मेडल, तिन्ही महिला! लव्हलिना बोर्गोहाइन तू एक स्टार आहेस आणि तू खूप आक्रमक आहेस’ या आशयाचे ट्वीट तापसीने केलय

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं. कांस्य पदक जिंकल्यानंतर लव्हलिनावर भारतीयांनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने केलेल ट्वीट चर्चेत आहे. तापसी पन्नूने लव्हलिनाला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

    ‘३ मेडल, तिन्ही महिला! लव्हलिना बोर्गोहाइन तू एक स्टार आहेस आणि तू खूप आक्रमक आहेस’ या आशयाचे ट्वीट तापसीने केलय. तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या ट्वीटवर कमेंटवर लव्हलिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. लव्हलिनाचे पदक हे गेल्या नऊ वर्षांतील ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताचे पहिले पदक आहे.