taarak mehta and jethalal

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’(Taarak Mehta ka Ooltah Chashmah) या मालिकेत जेठालालची(jethalal) भूमिका दिलीप जोशी साकारत आहेत तसेच तारक मेहताची(Taarak Mehta) भूमिका शैलेश लोढा साकारतात.जेठालालच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तर तारक मेहता कायम त्याच्या मदतीला तयार असतात. मात्र,त्या दोघांमधली ही मैत्री फक्त सीरियलपुरतीच मर्यादित आहे.

    ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’(Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता (jethalal and taarak mehta fight)या दोघांची मैत्री सगळ्यांनीच अनुभवली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालची भूमिका दिलीप जोशी साकारत आहेत तसेच तारक मेहताची भूमिका शैलेश लोढा साकारतात.जेठालालच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तर तारक मेहता कायम त्याच्या मदतीला तयार असतात. मात्र,त्या दोघांमधली ही मैत्री फक्त सीरियलपुरतीच मर्यादित आहे. खऱ्या आयुष्यात त्या दोघांना एकमेकांशी बोलायलासुद्धा आवडत नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी आणि शैलेश लोढा अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नाहीयेत. ते शुटींगपुरतेच एकत्र असतात. त्यानंतर ते एका ठिकाणी एकत्र कधीच थांबत नाहीत. सीन आटपला की आपल्या-आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून जातात.दिलीप जोशी आणि शैलेश लोढा यांचे खूप जुने भांडण आहे. मात्र या भांडणामागचे कारण कुणालाही माहित नाही.

    ते दोघे ज्याप्रकारे अभिनय करतात ते पाहून त्यांच्यात भांडण झालं आहे, असं कुणालाही वाटणार नाही.इतके वर्ष एकत्र काम करणारे कलाकार प्रत्यक्षात मात्र विभक्त राहणे पसंत करतात ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे.