‘तारक मेहता…’मधील टप्पूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन, कोकिलाबेन रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास!

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर भव्यच्या वडिलांना मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या ११ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

  तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत टिप्पूची भूमिका साकारणार अभिनेता भव्य गांधीच्या वडिलांचं निधन झालं आहे. विनोद गांधी यांच कोरोनामुळे निधन झालं आहे. भव्यच्या वडिलांना ११ मे रोजी मुंबईमधील रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर भव्यच्या वडिलांना मुंबईमधील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या ११ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि दोन मुले निश्चित आणि भव्य असा परिवार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97)

  भव्यने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत टिप्पू ही भूमिका जवळपास ९ वर्षे साकारली होती. त्याला या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. पण २०१७मध्ये त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने काही गुजराती चित्रपटांमध्ये काम केले.