tahirakashyap

ताहिरा आणि आयुषमान यांना बॉलिवूडमधील क्यूट कपल मानले जाते. आयुषमानने ताहिराला कसे प्रपोज केले होते हे त्याने गेल्या वर्षी इन्स्टाग्रामद्वारे सांगितले होते.

    आयुषमान खुराणा आणि ताहिरा कश्यप यांनी अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी २००८ साली लग्न केलं. त्यांना वीराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुलं आहेत. वीराजवीरचा जन्म २०१२ मधील तर वरुष्काचा जन्म २०१४ मधील आहे. त्यांच्या अफेअरला आज २० वर्षं पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ताहिराने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

    ताहिराने शेअर केलेल्या व्हिडिओत ताहिरा आणि आयुषमानचे जुने फोटो, त्यांनी एकत्र घालवलेला वेळ, आठवणींचा खजिना बघायला मिळत आहे. या फोटोंमध्ये तर ते दोघे इतके वेगळे दिसत आहेत की, त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे.

    ताहिरा आणि आयुषमान यांना बॉलिवूडमधील क्यूट कपल मानले जाते. आयुषमानने ताहिराला कसे प्रपोज केले होते हे त्याने गेल्या वर्षी इन्स्टाग्रामद्वारे सांगितले होते. त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, ते २०२१  चे वर्षं होते… आम्ही आमच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होतो. मी रात्री ताहिरासोबत फोनवर बोलत होतो. रात्री १ वाजून ४८ मिनिटांनी फोनवर बोलत असताना माझ्या मनातील भावना मी ताहिराला सांगितल्या होत्या. त्यावेळी ब्रायन एडम्सचे गाणे माझ्या डोक्यात घुमत होते. त्या गोष्टीला १९ वर्षं झाली.