kangna

करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा’ अशी विनंती कंगना राणावतने ट्विट करत भारत सरकारला केली आहे. एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून बोलताना करणने मला ही इंडस्ट्री सोडून जाण्याविषयी वक्तव्य केलं होतं असंही कंगनाने ट्विटरवर म्हटलंय.

‘करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा’ अशी विनंती कंगना राणावतने ट्विट करत भारत सरकारला केली आहे. एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून बोलताना करणने मला ही इंडस्ट्री सोडून जाण्याविषयी वक्तव्य केलं होतं असंही कंगनाने ट्विटरवर म्हटलंय. उरीवेळी करणने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. सुशांतच करिअरही त्यानेच संपवलं, आणि आता तर त्याने भारतीय सैन्यावर देशद्रोही चित्रपट बनवला आहे.‘ असं भडकावू विधान अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या ट्विटरवर केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून करण जोहरची निर्मिती असलेल्या गुंजन सक्सेना सिनेमावरून अनेक वाद निर्माण होतायेत. गुंजन सक्सेना या सिनेमावर भारतीय हवाईदलानेही नाराजी दर्शवली होती. तसंच गुंजन सक्सेनासोबत भारतीय हवाई दलात प्रशिक्षण घेतलेल्या श्री विद्या राजन यांनाही गुंजन सक्सेना सिनेमावर नाराजी दर्शवत ट्विट केलंय. त्यांच्या टिव्टलाच रिट्विट करत कंगनाने करण जोहरवर निशाणा साधला आहे.