कंगनावर दंडात्मक कारवाई करा; बीएमसीची हायकोर्टाकडे मागणी

मुंबई महानगर पालिकेने  खारमधील पाली हिल येथील अभिनेत्री कंगना रानौतच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देताना बीएमसीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

 मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौतने (Kangana Ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर कंगणावर टीकेची झड सुरू झाली होती. त्याचप्रमाणे कंगना मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगना राणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेचा (BMC)  हातोडा पडला आहे आणि पालिकेने सकाळी ११ वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली.

मुंबई महानगर पालिकेने  खारमधील पाली हिल येथील अभिनेत्री कंगना रानौतच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाकडून दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देताना बीएमसीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यात पालिकेची कारवाई योग्यच असल्याचे म्हणण्यात आले आहे.

खोटे दावे करत याचिका दाखल केल्याबद्दल कंगनावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. कंगनाच्या मालमत्तेत १४ निहमबाह्य बदल करण्यात आले होते. त्यामुळे केलेली कारवाई योग्यच असल्याची ठाम भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे.

तत्पूर्वी, कंगनाच्या मुंबईतील बंगल्यात जे अनधिकृत बांधकाम झाले आहे, त्या संबंधात मुंबई महापालिकेने तिला २ वर्षांपूर्वीच नोटीस दिली होती आणि त्याचवेळी ती या नोटीशीच्या विरोधात कोर्टातपण गेल्याची माहिती मिळाली आहे.