तान्या मानिकत लवकरच दिसणार ‘या’ वेबसिरीजमध्ये!

मी माझ्या इमेजिनेशनचादेखील उपयोग करू शकत होते. यात साकारलेली शिखा एक तरुण, चुलबुली मुलगी आहे, जी आपला सोबती, त्याच्या आकांक्षा आणि स्वप्न यांच्या सोबत आहे.

    तान्या मानिकत लवकरच सोनी लिवच्या बहुप्रतीक्षित वेब सीरीज ‘चुट्ज़पाह’मध्ये दिसणार असून, यात वरुण शर्मा, मनजोत सिंह, गौतम मेहरा, एलनाज़ नोरौज़ी आणि क्षितिज चौहान आदी कलाकार आहेत. तान्या यात अभिनेत्री शिखाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही वरुण शर्माची ऑन-स्क्रीन प्रेमिका आहे. याविषयी तान्या म्हणाली की, मागच्या प्रोजेक्ट्सच्या तुलनेत या वेळेची शूटिंग प्रक्रिया थोड़ी कठिण होती. कारण सद्य परिस्थितीत कमीतकमी क्रू सदस्य आणि चारी बाजूला गैजेट्सच्या वेढ्यात शूटिंग पार पडलं आहे.

    कोणताही सीन वास्तविक सहकलाकाराशिवाय परफॉर्म केल्यामुळं इमेजिनेशनचा कस लागला आहे. तुम्हाला जर हे माहिती नसेल की तुमच्या सह-कलाकारानं या विशेष दृश्यात काय केलं आहे, तर त्यावर अभिनय करणं अवघड असतं. यामध्ये, मला पूर्णपणे स्क्रीनकडं पाहून अभिनय करायचा होता, जे एक मोठे आव्हान होतं. मात्र माझ्या साहाय्यासाठी माझ्यासोबत दिग्दर्शक सिमरप्रीत सिंह आणि त्यांची टीम होती. हा एक संपूर्णपणे नवा अनुभव होता.

    मी माझ्या इमेजिनेशनचादेखील उपयोग करू शकत होते. यात साकारलेली शिखा एक तरुण, चुलबुली मुलगी आहे, जी आपला सोबती, त्याच्या आकांक्षा आणि स्वप्न यांच्या सोबत आहे. ती आपल्या आजूबाजूच्या लोकांचं भलं करण्यावर विश्वास ठेवते. ती नेहमीच एक शेल्टर्ड आणि प्रोटेक्टेड आयुष्य जगली आहे, तरीही तिचे पाय जमिनीवर आहेत.”