Tappu Fida on Jethalal's crush! In ‘Babita’ and ‘Tappu’ relationships; 9 years apart in age between the two

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांच्या रिअल लाईफ मध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट आला आहे. जेठालालच्या क्रश वर टप्पू फिदा झाला आहे. बबिता जींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत (Raj Anadkat) दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे.

    मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांच्या रिअल लाईफ मध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट आला आहे. जेठालालच्या क्रश वर टप्पू फिदा झाला आहे. बबिता जींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत (Raj Anadkat) दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे.

    ई-टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुनमुन आणि राज दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे गॉसीप सुरु आहे. मुनमुन सोशल मिडीयावर चांगलीच एक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे अनेक फोटे शेअर करत असते. राज तिच्या फोटोंवर करत असलेल्या कमेंट्ंसमुळे त्यांच्या अफेरअरची चर्चा रंगली आहे.

    राजच्या कमेंट्स पाहून दोघेही खूप चांगले आणि एकमेकांचे जवळचे मित्र आहेत असेच वाटेल. मात्र, त्यांचे संबध मैत्रीपेक्षा अधिक असल्याचे रुमर पसरले आहेत.दोघांच्या वयामध्ये 9 वर्षांचे अंतर आहे. मुनमुन राज पेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे.

    13 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिकेचा TV वर दबदबा आहे. सुरुवातीपासूनच मुनमुन दत्ता शोमध्ये मुख्य भूमिकेत होती. विशेषत: जेठालाल आणि बबिताजींचे क्रशवाले सीन चाहते खूप पसंत करतात. ‘टप्पू’चे बालवयातील पात्र अभिनेता भव्य गांधी यांने साकारले होते. मात्र, 2017 मध्ये मोठ्या टप्पूची एन्ट्री झाली. भव्यने हा शो सोडल्यानंतर राजने टप्पूची भूमिका साकारण्यास सुरुवात केली.