disha vakani

दिशा एका भागासाठी तब्बल १.२५ लाख रुपये मानधन आकारते मात्र आता ती १.५० लाख रुपयांची मागणी करत आहे. त्यामुळे दिशा सध्या मालिकेत दिसून येत नाही. शिवाय ती परतणार नसल्याचंही म्हटलं जात होतं.

    ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या मालिकेत दयाबेन पुन्हा दिसून येणार आहे पण एका नव्या रूपात. ही मालिका लवकरच अॅनिमेटेड रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोनी टीव्हीनं इन्स्टाग्राम वर पोस्ट केला होता. त्यामध्ये दयाबेन, जेठालाल, टप्पू, बाबूजी हे सर्व लोक ऍनिमेटेड अवतारात दिसून आले होते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sony YAY! (@sonyyay)

    दिशा वकानी २०१७ पासून या मालिकेतून गायब आहे. २०१७ मध्ये दिशा गरोदर होती त्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. समोर आलेल्या माहितीनुसार दिशा वकानी मानधनाच्या मुद्द्यामुळे मालिकेत परतत नसल्याचं सांगण्यात येतं आहे. परत येण्यासाठी तिनं मानधन वाढवून मागितलं आहे. दिशा एका भागासाठी तब्बल १.२५ लाख रुपये मानधन आकारते मात्र आता ती १.५० लाख रुपयांची मागणी करत आहे. त्यामुळे दिशा सध्या मालिकेत दिसून येत नाही. शिवाय ती परतणार नसल्याचंही म्हटलं जात होतं.

    आता अनिमेटेड रूपात का होईन दिशा पुन्हा मालिकेत दिसणार म्हटल्यावर तीचे चाहते सुखावले आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला तब्बल १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र माझं असंही एक स्वप्न होतं की लहान मुलांसाठी अॅनिमेशन रुपात सुद्धा ही मालिका आणावी आणि यासाठी मी खूप दिवसांपासून या प्रयत्नात होतो. सोनी असोसिएशनमुळे माझं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.