सापडलं… जेठालालंच गडा इलेक्ट्रॉनिक्स आहे मुंबईतील ‘या’ भागात,तर मालकाच नाव आहे..!

या दुकानाच्या मालकाचे नाव शेखर गडियार असे आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनंतर त्यांनी या दुकानाचे नाव बदलून गडा इलेक्ट्रॉनिक्स असे ठेवले आहे.

  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील जेठालालचे गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shekhar Gadiyar (@shekhargadiyar)

  गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान मुंबईत खरेखुरे असून या दुकानाचा मालक गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी हे दुकान भाड्यावर देतो. गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे खरे नाव शेखर इलेक्ट्रॉनिक्स  आहे. या दुकानाच्या मालकाचे नाव शेखर गडियार असे आहे. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनंतर त्यांनी या दुकानाचे नाव बदलून गडा इलेक्ट्रॉनिक्स असे ठेवले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shekhar Gadiyar (@shekhargadiyar)

  गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान खार येथे असून अनेक वर्षांपासून हे दुकान ते चित्रीकरणासाठी भाड्यावर देतात. भाड्यावर दिल्यानंतर आपल्या दुकानाचे चित्रीकरणादम्यान काही नुकसान होणार नाही ना… याची काळजी त्यांना सुरुवातीला वाटत होती. पण आजपर्यंत कधीच त्यांचे चित्रीकरणादरम्यान नुकसान झालेले नाही. हे दुकान आता पर्यटनस्थळ बनले असून लोक खास हे दुकान पाहाण्यासाठी येतात आणि आवर्जून फोटो काढतात.