Tarak Mehta's inverted glasses; After Daya Ben's Veera Sundar, Bhide Masters were infected with Corona in Gokuldham Society.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘भिडेची’ ची भूमिका साकारणार्‍या मंदार चांदवडकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मयूर वाकानी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सेटवरील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली.

    मुंबई : देशात पून्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. बॉलीवुडसह टी व्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सुंदरलाल’ची भूमिका साकारणार्‍या मयूर वाकानी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या माहिलेतील आणखी एका कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे.

    ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘भिडेची’ ची भूमिका साकारणार्‍या मंदार चांदवडकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मयूर वाकानी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सेटवरील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली.

    यापैकी चांदवडकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यामुळे मंदार यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.