डिसेंबरपासून सुरु होणार ‘तेजस’ चित्रपटाचे चित्रीकरण

गेल्या वर्षी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’च्या अभूतपूर्व यशानंतर आरएसवीपीचा वायु सेनेवरील आगामी चित्रपट ‘तेजस’ (tejas)यावर्षीच्या डिसेंबरमध्ये चित्रीकरणासाठी सज्ज असल्याची घोषणा केली.

‘तेजस’ ही एका साहसी आणि निडर फायटर पायलटची कहाणी आहे. यात कंगना राणावत(kangna ranawat) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  भारतीय वायु सेनेने महिलांना प्रत्यक्ष युद्ध भूमिकेत घेण्यास २०१६ मध्ये सुरुवात केली. महिलांना प्रत्यक्ष युद्ध भूमीत उतरवणारी देशातील ही पहिलीच सुरक्षा सेना होती आणि हा चित्रपट याच ऐतिहासिक घटनेने प्रेरित आहे.

कंगनाने या चित्रपटाविषयी सांगितले की, “तेजस एक विस्ताराने सांगितलेली कहाणी आहे. ज्यात मला वायु सेनेच्या पायलटची भूमिका निभावण्याचे भाग्य मिळाले. मी एका अशा चित्रपटाचा भाग बनणे माझ्यासाठी खूप गौरवाची बाब आहे, जिथे गणवेषात प्रत्येक पराक्रमी पुरुष आणि महिलेला सलाम केला जाईल. चित्रपटात सशस्त्र दल आणि त्यातील हिऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सर्वेश आणि रॉनीसोबत या प्रवासासाठी मी खूपच उत्साही आहे.”

सर्वेश मेवाडाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित करण्यात आलेली  ही उरी: द सर्जिकल स्ट्राइक नंतर आरएसवीपीचा हा दुसरा चित्रपट आहे जो देशाच्या सशस्त्र शक्तींना सलाम करते आणि देशाला प्रेरित करण्याचे लक्ष्य ठेऊन बनवण्यात आला आहे.