अभिनेता तेजस पर्वतकर यांचे निधन – सत्यजीत दुबे यांनी इन्स्टाग्रामवर दिली माहीती

यावर्षी फिल्म जगतातील दिग्गज कलाकारांची एक्झिट मनाला धक्का लावून गेली. ऋषी कपूर, इरफान खान, सुशांत सिंह राजपूत या कलाकारांचे निधन झाले. आता आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी आज समोर आली आहे.

यावर्षी फिल्म जगतातील दिग्गज कलाकारांची एक्झिट मनाला धक्का लावून गेली. ऋषी कपूर, इरफान खान, सुशांत सिंह राजपूत या कलाकारांचे निधन झाले. आता आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी आज समोर आली आहे. अभिनेता तेजस डी पर्वतकर यांचे निधन झाले आहे. सत्यजीत दुबे यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही दु:खद बातमी दिली आहे. मात्र त्यांचे निधन कशामुळे झाले त्याचे कारण अजूनही कळलेले नाही.

अभिनेता सत्यजीत दुबे यांनी म्हटले आहे की, एक चांगले कलाकार आणि मित्र तेजस डी पर्वतकर आज आपल्याला सोडून गेले आहेत. ते खूप हुशार होते. साहीत्य आणि रंगभूमीबाबत ते नेहमी चर्चा करत असायचे. पु ल देशपांडेंचे ते चाहते होते. मुंबई डायरीजच्या सेटवर आम्ही भेटलो होतो. त्यांच्या आठवणी कायम ह्रदयात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित ‘मुंबई डायरीज २६/११’ या वेबसीरीजमध्ये तेजस झळकले होते. तसेच ‘मुंबईचा राजा’, ‘हवा आन दे’, ‘सनराईज’ या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.