तुम्ही लवकर लग्न करा…आशुतोषने तेजश्रीसोबत शेअर केलेला फोटो बघून चाहत्यांनी केली मागणी, कॅप्शन वाचून सुरू झाली चर्चा

तेजश्री आणि आशुतोषचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावर चाहते सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आशुतोष व तेजश्री फक्त बेस्ट फ्रेंड आहेत.

    ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेतील शुर्भा अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकताच वाढदिवस साजरा केला. २ जूनला तेजश्रीचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी तेजश्रीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मीडियावर तेजश्रीसाठी खास पोस्टही शेअर केल्या गेल्यात. यातल्याच एका पोस्टने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलय. ही पोस्ट होती अभिनेता आशुतोष पत्कीची.

    आशुतोषने तेजश्रीसोबतचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होता. आशुतोषची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. आशुतोष म्हणतो,

    ‘माझी बेस्ट फ्रेंड.. मला तुला सांगायचे आहे की तू माझ्यासाठी खूप काही आहेस. मला सतत प्रोत्साहन देण्यासाठी, मला सतत पाठींबा देण्यासाठी शिवाय एक चांगला व्यक्ती आणि एक उत्तम अभिनेता होण्यासाठी तू केलेल्या मदतीसाठी तुझे खूप खूप आभार,’ असे आशुतोषने ही पोस्ट शेअर करताना लिहिलेय. शिवाय तेजश्रीला काही टीप्सही दिल्या आहेत.‘वाढदिवशी तुला दोन टीप्स देईन… पहिली म्हणजे भूतकाळ विसरून जा, कारण तू तो बदलू शकत नाही. दुसरी म्हणजे, गिफ्टबद्दलही विसर, कारण मी तुझ्यासाठी ते घेतलंच नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा…

    तेजश्री आणि आशुतोषचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावर चाहते सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आशुतोष व तेजश्री फक्त बेस्ट फ्रेंड आहेत. पण ही पोस्ट वाचून चाहत्यांनी मात्र वेगळाच अंदाज बांधणे सुरु केले आहे. इतकेच नाही तर एका युजरने चक्क तुम्ही लग्न करा ना अशी प्रेमळ विनंती केली आहे. खूप छान जोडी आहे तुमची, आम्हाला नवीन घोषणा ऐकायला मिळेल का? अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

    ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत तेजश्री व आशुतोष दोघांनी एकत्र काम केले होते. तेजश्रीने शुभ्रा साकारली होती तर आशुतोषने बबड्याची भूमिका साकारली होती.