tejaswini navratri police tribute

पोलिसांना अभिनेत्री तेजस्विनी पंडित(tejaswini pandit navratri special photo shoot) हीने नवरात्री स्पेेशल फोटोशूटच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने सलामी(salute to mumbai police) दिली आहे.

लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अहोरात्र झटत असतात. त्यांचे काम सगळ्यांनाच माहीत आहे. सणाच्या दिवशीसुद्धा पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. याच पोलिसांना अभिनेत्री तेजस्विनी पंडित(tejaswini pandit navratri special photo shoot) हीने नवरात्री स्पेेशल फोटोशूटच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने सलामी(salute to mumbai police) दिली आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी काही ना काही वेगळा उपक्रम करत असते. यावेळी तिने कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. तेजस्विनीने तिचा पोलिसांच्या वेशातील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये देवी पोलिसांच्या रुपात वयस्कर बाईला मदत करताना दिसत आहे.समाजासाठी काम करणारे पोलीस हे देवाचेच रुप आहे, हा संदेश तिने या फोटोच्या माध्यमातून दिला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहीले आहे की, “सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती. तू नाहीस असहाय माते ! हात माझा सदैव तुझ्या हाती सदैव तुझ्या साठी….”

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या फोटोशूटविषयी सांगते, “ जेव्हा आपण लॉकडाऊनच्या काळात स्वत:च्या सुरक्षेसाठी घरात होतो. तेव्हा आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचारी मात्र उन्हा-तान्हात, पावसा-पाण्यात आपला जीव धोक्यात घालून ‘ऑनड्युटी’ दक्ष होते. काही लोकांनी ह्याकाळात पोलिसांवरच टीका केली. मात्र पोलिसांनी आपल्या माणूसकीचे किंबहूना काही ठिकाणी तर ‘दैवी’ वृत्तीचे दर्शन दाखवले. कोणी ज्येष्ठ नागरीकांना मदतीचा हात दिला, तर कोणी रूग्णांच्या मदतीला धावून गेले.”

तेजस्विनी पंडित पुढे म्हणते, “आबालृवृध्दांना मदत करताना अनेक पोलिस कर्मचारी दिवसाचे २२ तास तहानभूक विसरून राबत होते. अनेकांना तर कर्तव्यापोटी तीन-चार महिने आपल्या घरातल्यांपासूनही दूर रहावे लागले. आपण देवीची अनेक रूपं मानतो. चंडिका, भवानी, अंबाबाई.. देवीने अनेक रूपात येऊन ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ केलेले आहे. याच वाटेवर चालणाऱ्या पोलिसांना माझी ही मानवंदना आहे.”

काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तेजस्विनीने डॉक्टरांच्या कार्याला सलाम  करण्यासाठी  डॉक्टरांच्या रुपात देवीचा एक फोटो शेअर केला होता. तेजस्विनी दरवर्षी नवरात्रीमध्ये अनोख्या पद्धतीने देवीच्या वेशातील फोटो शेअर करत असते.