लॉकडाऊननंतर जुलै महिन्यात ‘टेनेट’ चित्रपट होणार प्रदर्शित

कोरोनामुळे जगभरात  एक विचित्र वातावरण तयार झाले आहे. प्रत्येक क्षेत्रावर याचा परिणाम होताना दिसत आहे. मनोरंजन क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहेत. असे सगळे असताना हॉलीवूडमधील दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलान यांनी आपला ‘टेनेट’ हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नोलान यांनी आपल्या ‘टेनेट’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून हा चित्रपट चित्रपटगृहामध्येच प्रदर्शित होणार असल्याची बातमी दिली आहे. एक अॅक्शनपट असलेला ‘टेनेट’ हा चित्रपट दुसरे विश्वयुद्ध रोखण्यासाठी काम करणाऱ्या शूरांवर आधारित आहे. जॉन डेव्हिड वॉशिंग्टन आणि रॉबर्ट पॅटीन्सन यांच्या या चित्रपटात प्रमूख भूमिका आहेत. जुलै महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.