‘राधाकृष्ण’ मालिकेत महादेव शिवाची भूमिका करणारा ‘हा’ अभिनेता लवकरच साकारणार हनुमानाची व्यक्तिरेखा

या भूमिकेसाठी निवडले याचा अर्थ मीच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो असे त्यांना वाटले असणार... मला आता माझ्या या दोन्ही भूमिकांवर अपार मेहनत घ्यावी लागणार आहे आणि दोन्ही भूमिकांसाठी अनेक तास बसून मेकअप करावा लागेल.’

    स्टार भारत वाहिनीवरील ‘राधाकृष्ण’ मालिकेत प्रेक्षकांनी आतापर्यंत अनेक व्यक्तिरेखा पाहिल्या. याच प्रेक्षकांना आता आणखी एक नवी व्यक्तिरेखा यात पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ कुमार तिवारी यांची मॅगनम ओपस ‘राधाकृष्ण’ ही मालिका मास्टरपीस तर आहेच, पण ती पौराणिक असूनही प्रेक्षकांना आपलीशी वाटते. टीव्ही विश्वात लोकप्रिय असलेला अभिनेता तरुण खन्ना या मालिकेत तब्बल अडीच वर्षे महादेव शिव शंकराची भूमिका करत आहे. आता लवकरच तो याच मालिकेत हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचे चित्रीकरणही नुकतेच सुरू झाले आहे.

    महावीर हनुमान हे शंकराचे ११वे रूद्रावतार मानले जातात. ते सर्वाधिक बलवान आणि बुद्धीमानही आहेत. कारण खुद्द भगवान शंकरच वाईटाचा नाश करणारे म्हणून ओळखले जातात आणि भगवान हनुमानाकडेही संकटमोचक म्हणूनच पाहिले जाते.

    मालिकेत बराच काळ भगवान शिव शंकराची व्यक्तिरेखा साकारणारा अनुभवी अभिनेता तरूण खन्ना आता हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत अधिक बोलताना तो म्हणतो, ‘खरे तर हनुमानाची भूमिका करायला मी नकारच दिला असता, पण ही ऑफर याच प्रॉडक्शन हाऊसने दिली, म्हणून मी ती स्वीकारली. याचे कारण असे की, हे प्रॉडक्शन हाऊस आपल्या मालिकेतील व्यक्तिरेखा खूप छान लिहितात आणि सादर करतात. अन्य प्रॉडक्शन हाऊसना ते जमणार नाही. त्यांनी मलाच या भूमिकेसाठी निवडले याचा अर्थ मीच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो असे त्यांना वाटले असणार… मला आता माझ्या या दोन्ही भूमिकांवर अपार मेहनत घ्यावी लागणार आहे आणि दोन्ही भूमिकांसाठी अनेक तास बसून मेकअप करावा लागेल.’

    स्वस्तिक प्रॉडक्शन हाऊसने हनुमानाच्या या भूमिकेसाठी काय विशेष व्यवस्था केली आहे ते सांगताना तो पुढे सांगतो, ‘हनुमानाच्या व्यक्तिरेखेत मला जास्त हलताही येत नाही. कारण माझ्या चेहऱ्यावर मोठा मेकअप असतो. माझा पोषाखही वेगळ्या प्रकारचा आहे. माझ्यासाठी खास खुर्ची ठेवण्यात आली आहे, ज्यावर मी रिकाम्या वेळी बसू शकतो. कारण मला शेपूट लावलेली आहे. सध्या मी स्मुथी डाएटवर आहे. माझ्या चेहऱ्यावर हनुमानाचा मेकअप असताना मला फक्त तोच प्यावा लागतो. शूटिंगनंतर मला वेगळे डबिंग करावे लागते. कारण मेकअपमुळे मला डॉयलॉग बोलता येत नाहीत.’