द बॅटमॅनचा फर्स्ट लूक आणि बॅटसूटमध्ये दिसला रॉबर्ट पॅटीन्सन

हॉलीवूडमधील अभिनेता रॉबर्ट पॅटीन्सन यांच्या द बॅटमॅन या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट कॉमिक बूक सुपरहिरो बॅटमॅनवर आधारित आहे. चित्रपटाच्या शूटींगला सुरुवातदेखील झाली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मॅट रिव्ज यांनी केले आहे. सोशल मीडियावर मॅट यांनी आपल्या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फर्स्ट लूक दाखविणाऱ्या फोटोंमध्ये रॉबर्ट पॅटीन्सन बॅटमॅन सूटमध्ये दिसत आहेत. बॅटमोबाईलचा लूकही शेअर करण्यात आला आहे. बॅटमॅनवर आधारित हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.