तेरे नाम चित्रपटातील ‘ही’ भिकारीण खऱ्या आयुष्यात दिसते इतकी सुंदर!

सलमान खानला वेड्यांच्या ठिकाणी नेताना गाडीच्या मागे पळण्याच्या दृश्याने सर्वांचे डोळे ओलावले होते. या दृश्यात जीव टाकणारी  राधिका...

    सलमान खानच्या यशस्वी चित्रपटामध्ये तेरे नाम या चित्रपटाची हमखास गणना होते. या चित्रपटाच्या वेळी त्यातील कलाकाराचे कौतुकही झाले होते. तसेच हा एक प्रेम कथेवर आधारित चित्रपट होता.  जर तुम्ही  तेरे नाम हा चित्रपट पाहिला असेल तर त्या भिकार्‍यावर आधारित सर्वात शेवटचा देखावा म्हणजे ती ज्यामध्ये व्हॅनच्या मागे धावते. हे सर्व देखावे आपल्या मनाला भावनिक करतात.

    या चित्रपटात भिकारी म्हणून काम केलेली अभिनेत्री राधिका चौधरी आहे. कचरा गोळा करणारी तीची भिकारी भूमिका त्यावेळी तीने चित्रपटात साकारली होती. परंतु जरी ती चित्रपटात भिकारी म्हणून गलिच्छ दिसत असली तरी पण खऱ्या आयुष्यात ती खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसत आहे.

    या अभिनेत्रीने करिना कपूर आणि फरदीन खानचा खुशी या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. राधिका चौधरीने ही मूळ तेलगु अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे बॉलिवूड व्यतिरिक्त अनेक तेलगु चित्रपटांमध्ये तिने काम केल्याचे दिसुन येते.

    सलमान खानला वेड्यांच्या ठिकाणी नेताना गाडीच्या मागे पळण्याच्या दृश्याने सर्वांचे डोळे ओलावले होते. या दृश्यात जीव टाकणारी  राधिका होती. जरी या चित्रपटात तिची अगदी लहान भूमिका होती, पण ती भूमिका एक वेगळी होती, भूमिका खूप मजबूत होती, म्हणूनच आजही तिचे कौतुक होत आहे.

    पण तेरे नाम सारख्या सुपरहिट फिल्ममध्ये कमालीचा अभिनय करूनही या अभिनेत्रीला चित्रपट सृष्टीत आपली ओळख निर्माण करता आली नाही.