‘क्रांतिवीर राजगुरू’ वेबसिरीजचा श्रीगणेशा…वास्तव इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न

क्रांतिवीर राजगुरू (Krantiveer Rajguru) यांच्या वेबसिरीजच्या (webseries ) अभ्यासदौऱ्यानिमित्त डावीकडून कलावंत प्रदीप कडू, निर्मिती व्यवस्थापक प्रतिश सोनवणे ,लेखक आशिष निनगुरकर, राजगुरू यांचे पुतणे श्रीराम राजगुरू, सहाय्यक सुनील जाधव व कार्यकारी निर्माते विलास राजगुरू दिसत आहेत.

क्रांतिवीर राजगुरू (Krantiveer Rajguru) यांच्या आयुष्यावर निर्मिती होत असलेल्या वेबसिरीजसाठी (webseries ) अभ्यासदौरा सुरू झाला असून त्यात क्रांतिवीर राजगुरू यांचा वास्तव इतिहास (Real history) लोकांपर्यंत आणण्यासाठी काव्या ड्रीम मुव्हीजची (Kavya Dream Movies) संपूर्ण टीम मेहनत घेत आहे. यासाठी ते राजगुरू यांचे वास्तव्य असलेल्या विविध ठिकाणी भेट देत आहेत व माहिती गोळा करत आहेत. सुरुवातीला राजगुरू यांच्या वाड्यापासून त्यांनी श्रीगणेशा केला.

देशासाठी बलिदान देणाऱ्या शिवराम हरी राजगुरू यांच्या आयुष्यावर निर्मिती होत असलेल्या ‘क्रांतिवीर राजगुरू- एक धगधगती संघर्षगाथा’ या वेबसिरीजच्या टीमने राजगुरू यांचे पुतणे श्रीराम माधव राजगुरू यांची राहत्या घरी भेट घेतली. यावेळी या वेबसिरीजचे लेखक आशिष निनगुरकर, कार्यकारी निर्माते विलास राजगुरू,निर्मिती व्यवस्थापक प्रतिश सोनवणे,कलावंत प्रदीप कडू, स्टील फोटोग्राफर सिद्धेश दळवी व सहाय्यक कलावंत सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्या पंढरपूर येथे स्थायिक असलेले श्रीराम राजगुरू हे ९४ वर्षांचे असून त्यांच्या आयुष्यातील बालपणीचा काही काळ हा क्रांतिवीर राजगुरू यांच्या सानिध्यात गेला आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून राजगुरुंचा वास्तव व खरा इतिहास लोकांपर्यंत जावा या उद्देशाने त्यांनी वेबसिरीजसाठी संपूर्ण माहीती दिली. ही वेबसिरीज भव्य असणार आहे अशी माहिती राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरू यांनी दिली. या वेबसिरीजमध्ये अनेक दिग्गज कलावंत काम करत असल्याची माहिती क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिद्धेश राजगुरू यांनी दिली. लवकरच ही वेबसिरीज आपल्याला भेटीला येणार आहे.