झी ५ वरील ‘द कसीनो’ वेबसीरिजने सेलिब्रिटींचीही मिळवली दाद, अनेकांनी केले सीरिज पाहण्याचे आवाहन

लॉकडाऊनच्या काळात अनेक वेबसीरिज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. अलिकडेच झी ५ वर ‘द कसीनो’ ही थ्रिलर सीरिज प्रदर्शित झाली असून ही सीरिज प्रेक्षकांसह अनेक

लॉकडाऊनच्या काळात अनेक वेबसीरिज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. अलिकडेच झी ५ वर ‘द कसीनो’ ही थ्रिलर सीरिज प्रदर्शित झाली असून ही सीरिज प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटींच्याही पसंतीस उतरत आहे. हार्दिक गज्जर दिग्दर्शित या सीरिजमध्ये अभिनेता करणवीर बोहरा मुख्य भूमिकेत झळकला आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या माध्यमातून त्याने वेबविश्वात पदार्पण केले आहे. ही सीरिज थ्रिलर असल्यामुळे याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या सीरिजमध्ये अभिनेता करणवीर बोहरा, सुधांशू पांडे आणि मंदाना करिमी हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

त्यातच अभिनेता सुनील शेट्टी, नील नितीन मुकेश, हितेश तेजवानी,भारती सिंग, राज कुंद्रा या सारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या सीरिजचं कौतुक केलं आहे. अनेक कलाकारांनी ही सीरिज पाहण्याचे प्रेक्षकांना आवाहनही केले आहे. या सीरीजने प्रेक्षकांना आपल्याकडे पूर्णपणे आकर्षित केले असून सगळ्यांनी एका रोमांचक नोटवर आपल्या वीकेंडची सुरुवात केली आहे असे म्हणायला हरकत नाही. दर्शकांव्यतिरिक्त टेलीविजन आणि बॉलीवुड कलाकारांच्या देखील ही मालिका पसंतीस उतरत आहे. दिवसभरात या शोबाबत अनेकांनी ट्वीट करून मालिकेबाबत आपली पसंती व्यक्त केली:

सुनील शेट्टीने ही सीरिज चांगली असल्याचे म्हटले आहे. या सीरिजसाठी त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. तर नील नितिन मुकेश यानेही, सुधांशु पांडेला या वेबसीरिजसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हितेन तेजवानी, मनीष पॉल राज कुंद्रा इत्यादी अनेकांनी ही सीरिज पाहण्याचे आवाहन लोकांना केले आहे. सीरीजला सर्वस्तरातून मिळणारे चाहत्यांचे प्रेम याचा पुरावा आहे की केवळ प्रेक्षकच नव्हे, तर  सिने उद्योगातील मान्यवरांना देखील याबाबत उत्सुकता होती. आता याच्या प्रदर्शनासोबतच यातील गुपित देखील उघड होणार आहे की शेवटी सिंहासनावर कोणाचे नाव लिहिले आहे. आणि कोण ‘द कसीनो’ची बाजी जिंकणार आहे.  

दहा एपिसोडची ही सीरीज रोमांचक आहे कारण यातील प्रत्येक एपिसोडमध्ये थ्रिल आणि लेवल्सचे योग्य मिश्रण आहे जे दर्शकांना थक्क करून सोडते. याची कथा एक श्रीमंत मात्र विनम्र मुलगा विक्कीच्या आसपास फिरते, जो आपल्या वडिलांच्या बहु-अरब डॉलरच्या कसीनोचा उत्तराधिकारी आहे. या सीरीजमध्ये एका हाय क्लास समाजातील रहस्य आणि षडयंत्राला सादर करण्यात आले आहे.  या शोमध्ये करणवीर बोहरा, सुधांशु पांडे आणि मंदाना करीमी मुख्य भूमिकेत आहेत. प्रत्येक आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने लोकांच्या मनात खास जागा बनवली आहे. सीरिज हार्दिक गज्जर द्वारे दिग्दर्शित करण्यात आली असून हार्दिक गज्जर फिल्म्स द्वाराच निर्मित आहे आणि खूप मोठ्या कालावधीनंतर खास करून झी ५ वर प्रदर्शित होते आहे.