‘आई कुठे काय करते’: नवरात्रोत्सवाचा जल्लोष, देशमुख कुटुंबात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व

कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसांत पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी बोलतात. महिलांच्या सुफलीकरणाचा सण म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे. देशमुख कुटुंबात हा पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार आहे.

    सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतही हा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे. देशमुख कुटुंबात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. सणाचं पावित्र्य जपत संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद लुटताना दिसतं. सध्या घरात तणावाचं वातावरण असलं तरी कांचन आजीनं मात्र पुढाकार घेत हा नवरात्रीचा सण साजरा करायचं ठरवलं आहे.

    कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसांत पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी बोलतात. महिलांच्या सुफलीकरणाचा सण म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे. देशमुख कुटुंबात हा पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार आहे.

    ‘मराठी परंपरा, मराठी प्रवाह’ हे स्टार प्रवाह वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या सणांच्या माध्यमातून मालिकांमध्ये मराठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. अरुंधती आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाचा हा भोंडला पहाणं रसिकांसाठीही काहीसं अनोखं ठरणार आहे.