‘सुखकर्ता दुःखहर्ता’ या गणपतीच्या रॉक स्वरूपातील आरतीला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हा उत्साह कायम राखण्यासाठी पूजा इंटरटेन्टमेंट निर्मित ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ह्या नवीन स्वरूपातील आरतीला गणेशभक्तांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, ह्या आरतीची दखल मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढत झूम अॅपद्वारे गणेशाच्या या नवीन स्वरूपातील आरतीचा ऑनलाईन आस्वाद घेतला. पूजा इंटरटेन्टमेन्टचे सर्वेसर्वा आदित्य सरफरे याचबरोबर ज्योती कदम, नंदू धुरंधर, अपर्णा सोनावणे आणि संगीत दिग्दर्शक आदित्य बर्वे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची ही ऑनलाईन भेट यशस्वीरीत्या पार पडली.

गणेशाची ही नवीन स्वरूपातील आरती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खा. राहुल शेवाळे यांचे मोठे योगदान लाभले आहे. गणपतीच्या या नवीन स्वरूपातील आरतीत सहभागी झालेल्या सर्व कलाकार आणि कोरोना योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. कोरोना योद्धांना समर्पित केलेली गणेशाची ही रॉक स्वरूपातली आरती प्रत्येकांनी पाहावी असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना केले आहे.

सदर आरती सागरिका म्युजिक युट्युब वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली सून लवकरच टीव्ही वाहिनीवर देखील प्रदर्शित केली जाणार आहे. विघ्नहर्त्याचा गजर करणा-या ह्या नव्या आरतीमध्ये दीपाली सय्यद. किशोरी शहाणे,विजय पाटकर, गौरव घाटणेकर, चिराग पाटील, विणा जगताप, ज्ञानदा रामतीर्थकर, मुग्धा परांजपे, अंगद म्हसकर, विघ्नेश जोशी, संदीप जुवटकर आणि उदय नेने या प्रसिद्ध कलाकारांबरोबरच वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल, सफाई कामगार ते अगदी पत्रकारांपर्यंत प्रत्येकांचा समावेश आहे.

रील आणि रियल नायकांना एकत्र आणणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही नवीन आरती यंदाच्या गणेशोत्सवात लोकांच्या मनात नवे चैतन्य भरण्यास यशस्वी ठरत आहे.

युट्युबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.