ऐश्वर्याचा ‘हा’ हिरो सध्या काय करतो माहितेय का? कधीकाळी सुपरस्टार होता हा पण आता…

मध्ये त्याने तामिळ रोमॅंटिक ड्रामा वैगसी पोराणतचू या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रशंसनीय ठरला. १९९८ मध्ये रिलीज झालेल्या जीन्स या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत त्याने अभिनय केला

    आजवर अनेक दाक्षिणात्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. काही जण यशस्वी झाले तर काहींना फारसं यश मिळालं नाही. असंच एक नाव म्हणजे प्रशांत थियागराजन.  बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत प्रशांतने सुमारे २३ वर्षांपूर्वी जीन्स हा चित्रपट केला होता. त्यावेळी तो सुपरस्टार म्हणून ओळखला जायचा. प्रशांत थियागराजन हा ऐश्वर्या राय हिच्या तिसऱ्या चित्रपटाचा म्हणजेच जीन्सचा हिरो होता. हा चित्रपट सुमारे २३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ मध्ये रिलीज झाला होता.

    प्रशांत थियागराजन याचा जन्म ६ एप्रिल १९७३  ला चेन्नईमध्ये झाला. प्रशांतचे वडील थियागराजन तामिळ सिनेसृष्टीतील प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक असल्याने साहजिकच प्रशांतचे रुपेरी पडद्यावर आगमन झालं. यामुळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय त्याने घेतला. कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेसृष्टीशी निगडीत असल्यानं त्याला फारसं स्ट्रगल करावं लागलं नाही. वयाच्या १७ वर्षी १९९०

    मध्ये त्याने तामिळ रोमॅंटिक ड्रामा वैगसी पोराणतचू या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रशंसनीय ठरला. १९९८ मध्ये रिलीज झालेल्या जीन्स या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत त्याने अभिनय केला. ९० च्या दशकात तो सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होता. शंकर दिग्दर्शित जीन्स या चित्रपटामुळे प्रशांतला अभिनेता म्हणून ओळख मिळाली.

    आपल्या 30 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये प्रशांतने तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय केला. थोली मुधु, मंगन (१९९४),कृष्णा (१९९६), जीन्स (१९९८), चॉकलेट (२००१), विजेता (२००३), शॉक (२००४), लंडन (२००५) आणि पौन्नार शंकर (२०११) हे त्याचे काही चित्रपट होय.

    परंतु २००० नंतर त्याची क्रेझ काहीशी कमी होऊ लागली. चुकीच्या चित्रपटांची निवड केल्याचं कारण यामागे सांगितलं जातं. २००६ मध्ये प्रशांतने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आणि २०११ मध्ये तो पुन्हा चित्रपटसृष्टीत परतला.