ज्येष्ठ चित्रपट निर्माता-दिग्दर्शक जॉनी बक्षी यांचे निधन, बॉलिवूडला आणखी एक धक्का

जॉनी बक्षीचे सिनेमावर खुप प्रेम होते, हॉलिवूडचा स्टार मार्लन ब्रॅन्डो याच्या नावाशी प्रभावित होऊन त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव ब्रॅन्डो ठेवले. जॉनी बक्षीने बरीच वर्षे राज खोसला यांच्या सहाय्यक म्हणून काम केले. जॉनी बक्षी देखील इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनचा (आयएमपीपीए) भाग होता. ते या संघटनेतील सक्रिय सदस्यांपैकी एक होते.

वर्ष २०२० हे बॉलिवूडसाठी खूप वाईट जात आहे. अनेक सेलिब्रिटींचे इंडस्ट्रीमध्ये निधन झाले आहे. आता शुक्रवारी रात्री प्रसिद्ध चित्रपट निर्माते जॉनी बक्षी (Johnny Bakshi) यांचे निधन झाले. (demise of veteran filmmaker-director Johnny Bakshi) त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर चित्रपट जगतात शोकाची व्यक्त होत आहे. राजेश खन्ना आणि गुलशन ग्रोव्हर स्टारर फिल्म ‘खुदाई’ देखील जॉनी बक्षी यांनी निर्मित केली होती. त्याने बॉलिवूडमधील सर्व बड्या कलाकारांसोबत काम केले.

जॉनी बक्षी यांनी मंजिल और भी है, ‘मेरा दोस्त मेरा दुश्मन’, ‘फिर तेरी कहानी याद है’, ‘विश्वासघात’, ‘रावण’ आणि ‘रात की सुबह नही’ यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. निर्माता म्हणून काम केले. जॉनी बक्षीने अखेर ‘कजरारे’ (२०१०) चित्रपटात काम केले होते. हिमेश रेशमिया या चित्रपटात होता.

सिनेमाशी होता खुप लगाव