Almost Suphal Sampurna

अप्पांमुळे सई आणि नचिकेतमध्ये दुरावा तर निर्माण होणार नाही ना? सई आणि नचिकेतच प्रेम जिंकेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंघाने मालिकेची कथा उलगडताना दिसते.

मालिकेत अप्पांना सई आणि नचिकेतच्या प्रेमाबद्दल कळलं असून अप्पा सध्या त्यांची परीक्षा घेताना दिसत आहेत. नचिकेत सगळा बिझनेस डिजिटल करावा यासाठी अप्पांना संगणकीकरण करण्यास सांगतो आणि अप्पा तयार होतात पण त्यासाठी लागणार खर्च नचिकेतने करावा असं ते सई करवी त्याच्यापर्यंत पोहोचवतात आणि नचिकेत त्यासाठी अप्पांकडूनच १० लाख उधार घेतो व स्वतःच घर त्यांच्याकडे तारण ठेवतो. अप्पा हळूहळू नचिकेतला त्याच्या अधिपत्याखाली आणून ठेवण्यात यशस्वी होत आहेत. तसेच नचिकेत पुण्याला गेलेला असताना अप्पा मुद्दामून सई आणि नचिकेत यांचं बोलणं होऊ नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. अप्पांमुळे सई आणि नचिकेतमध्ये दुरावा तर निर्माण होणार नाही ना? सई आणि नचिकेतच प्रेम जिंकेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.