बिग बॉसच्या घरातील समीकरणं बिघडली, घरात झाला पुन्हा राडा!

शमिता-राकेश, निशांत-मूस आणि दिव्‍या-झीशान यांनी त्‍यांचे कनेक्‍शन कायम ठेवले, पण प्रतीक, अक्षरा, नेहा व मिलिंद यांच्‍यामधील समीकरणे बदलली आणि मोठा ड्रामा घडला.

    तिसरा आठवडा!! बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये नवीन दिवस, नवीन प्रारंभ! घरातील सदस्‍यांना चॅलेंजेस्, ट्विस्‍ट्स व टर्न्‍स देण्‍यात आले आहेत. प्रेक्षकांसाठी या आठवड्यातील सोमवार अत्‍यंत रोमांचक ठरला. घरातील कनेक्‍शन्‍सना त्‍यांचे कनेक्‍शन्‍स बदलून नवीन कनेक्‍शन सुरू करण्‍याची संधी देण्‍यात आली. शमिता-राकेश, निशांत-मूस आणि दिव्‍या-झीशान यांनी त्‍यांचे कनेक्‍शन कायम ठेवले, पण प्रतीक, अक्षरा, नेहा व मिलिंद यांच्‍यामधील समीकरणे बदलली आणि मोठा ड्रामा घडला.

    प्रश्‍न पडला असेल ना, हे टास्‍क योग्‍यरित्‍या झाले का? नाही! बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये ड्रामा, हृदयभंग व वादविवाद होत असतात आणि हे टास्‍क त्‍यापेक्षा वेगळे नव्‍हते.बिग बॉसचा गेम ऑफ हार्ट्स प्रतीक व अक्षरासाठी चांगला ठरला नाही. प्रथम प्रतीकने मनापासून तिचा स्‍वीकार केला आणि त्‍यानंतर दोनदा तिचा हृदयभग केला. नेहाला प्रतीक, तर अक्षराला मिलिंद आवडू लागला आणि दोन प्रबळ महिलांमध्‍ये मोठा वादविवाद झाला.

    प्रतीक यामागील कारण सांगत म्‍हणाला, ”अक्षरा आणि गाबा यांच्‍यामध्‍ये उत्तम कनेक्‍शन आहे, ज्‍यामुळे त्‍यांनी एकत्र आले पाहिजे.” याबाबत प्रत्‍युत्तर देत अक्षरा पटकन म्‍हणाली, ”मला कोण आवडू लागला आहे, हे दुसरे कोणी ठरवू शकत नाही.” त्‍यानंतर नेहाला प्रतीक आवडू लागल्‍याचे समजल्‍यावर मिलिंदने रागाने प्रत्‍युत्तर दिले की, ”मला धक्‍काच बसला आहे. इतक्‍या लवकर तर अंडे देखील शिजून पलटता येत नाही जितक्‍या लवकर तुम्‍ही पलटला आहात.”

    वादविवाद शिगेला पोहोचला आणि नेहा म्‍हणाली, ”मी एक खोटे कनेक्‍शन बनवणार नाही. मी तुझ्यासोबत असताना माझ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिले जाते.” याबाबत गाबाने प्रत्‍युत्तर दिले, ”तोंड सांभाळून बोल” नेहा म्‍हणाली, ”तुला माझ्याबाबत असे बोलण्‍याचा अधिकार नाही. मी हे सहन करू शकत नाही.” दोन महिलांमधील मोठ्या वादविवादासह टास्‍क संपले, जेथे अक्षराने त्‍यांचे कनेक्‍शन मोडण्‍यासाठी नेहाला दोषी मानले. अक्षरा नेहाला म्‍हणाली, ”तुम्‍ही माझे आणि प्रतीकचे कनेक्‍शन तोडू शकत नाही. तुम्‍ही एक हृदय तोडू शकता, पण माझ्या मनामध्‍ये असलेले तोडू शकत नाही.”