‘द फॅमिली मॅन 2’ च्या कलाकारांचीच हवा, आता होतेय भरमसाठ मानधनाची चर्चा!

अर्थात या मानधनाच्या आकड्यांबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. पण या आकड्यांची बी टाऊनमध्ये सध्या जबरदस्त चर्चा आहे.

  ‘द फॅमिली मॅन 2’चीच सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे. मनोज वाजपेयी, सामंथा अक्कीनेनी, प्रियामणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेबसीरिजने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. सामंथा अक्कीनेनी हिने साकारलेल्या ‘राजी’ या भूमिकेवर तर चाहते अक्षरश: फिदा आहेत. आपण या कलाकारांनी या सीरीजसाठी किती मानधन घेतलं हे बघणार आहोत. अर्थात या मानधनाच्या आकड्यांबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. पण या आकड्यांची बी टाऊनमध्ये सध्या जबरदस्त चर्चा आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Raj & DK (@rajanddk)

   ‘द फॅमिली मॅन 2’साठी मनोज वाजपेयीने सर्वाधिक मानधन घेतलं आहे. या वेबसीरिजमध्ये मनोजने श्रीकांतची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने १० कोटी रूपये घेतले. तर त्या खालोखाल साऊथ सुपरस्टार सामंथा अक्कीनेनीने या वेबसीरिजद्वारे ओटीटीवर हिंदीमध्ये डेब्यू केला आहे. या भूमिकेसाठी सामंथाने ३ ते ४ कोटी रूपये फी घेतल्याचं कळतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

  त्यानंतर सर्वाधिक रक्कम घेतली ती श्रीकांतची पत्नी सुचित्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्र्रियामणिने या सीरिजसाठी ८० लाख रूपये घेतले. तर जेकेची भूमिका साकारणारा अभिनेता शारीब हाशमी यानेही प्रियामणीच्या खालोखाल ६५ लाख रूपये फी घेतली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

  सीरिजमध्ये मेजर समीरची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शन कुमारने ‘द फॅमिली मॅन 2’साठी १ कोटी रूपये फी घेतल्याची चर्चा आहे. मराठमोळा अभिनेता शरद केळकर याचीही ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अरविंदची भूमिका त्याने साकारली आहे. यासाठी त्याने १.६ कोटी रूपये फी घेतल्याचे कळतेय. तर श्रीकांत तिवारीच्या मुलीची भूमिका साकारणारी अश्लेषा ठाकूर हिनेही ५० लाख रूपये घेतल्याचे समजतेय.