‘या’ गाण्यात झळकणार बाप-लेकिची एकत्रित जोडी

 हिंदी सिनेसृष्टीतील (Bollywood)  दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Actor Shatrughan Sinha) आणि त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा (Actress  Sonakshi Sinha) यांचे एक हिंदी गाणे (Hindi song) लवकरच प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे. या गाण्याचं नाव 'जरुरत' असं आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील (Bollywood)  दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Actor Shatrughan Sinha) आणि त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा (Actress  Sonakshi Sinha) यांचे एक हिंदी गाणे (Hindi song) लवकरच प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे. या गाण्याचं नाव ‘जरुरत’ असं आहे. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हे जरुरत या गाण्यात एकत्रित दिसणार आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन वरुण प्रभुदयाल गुप्ता यांनी केले आहे. हे गाणे नुकतेच रिलीज (Released) झाले असून चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये गाणे, कथा आणि रॅप याचा सुरेख मिलाप करण्यात आला आहे.

‘जरुरत’ हे गाणे आजची आवश्य्कता असून या गाण्यातून लोकांना एकमेकांच्या प्रति सहानुभूती निर्माण करण्यास मदत मिळेल. जरुरत हे गाणे सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. गाणे रिलीज झाल्यानिमित्त शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा असे म्हणाले. जरुरत या गाण्याबाबत श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत.