दृष्टीहीन कलाकार, संगीतकरांनी तयार केलाला पहिला मराठी चित्रपट ‘दृष्टांत’!

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित के झांजल यांनी केले आहे. या चित्रपटामुळे सामान्य लोकांना जगाला एका वेगळ्या प्रकारे जाणून घेता येईल. ‘दृष्टांत’ सुद्धा प्रेक्षकांना आपलेसे करेल यात शंका नाही.

    लवकरच ‘दृष्टांत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यामध्ये सर्व दृष्टिहीन कलाकारांनी काम केलय. मराठी चित्रपटाची परिभाषा बदलताना दिसेल. केवळ अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन आहेत. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगाने सुरू आहे. चित्रपट बनवण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की, सर्वसामान्य लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि तसेच अवयव दान आणि सामाजिकदृष्ट्या कमी भाग्यवान व्यक्तीला मदत करणे.

    चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यामध्ये झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा कलाकार अजिंक्य याभोवती चित्रपटाची मुख्य कथा आधारित आहे. या चित्रपटात बबिता, रतन आणि योगेश राव या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट दृष्टिहीन आणि ज्यांना ऐकू येत नाही अशा लोकांना बघता आणि ऐकता येईल याची विशेष काळजी घेतली आहे.