द फरगॉटन आर्मी, आझादी के लिए

शाळेमध्ये असताना इतिहासात स्वातंत्र्याच्या लढ्याचा गौरव वाचून उर भरून यायचा. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, विनायक दामोदर सावकरकर यांसारखे थोर क्रांतिकारकांमुळे आज आपण स्वातंत्र्यांत जगत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सन्मान मिळवून दिला. महात्मा गांधींचा सत्याग्रह…नेताजी सुभाषचंद्र बोसांचे तूम मुझे खुद दो मै तुम्हे आझादी दूंगा हे वाक्य इतिहासात अमर आहे. इतिहास हा गौरवांचा केला जातो. यशाचा केला जातो. पण कधी अपयशाचा इतिहास तुम्ही शिकला आहात का… जो कोणत्याही स्पर्धेत पहिला येतो त्याचं महत्त्व सर्वजण बघतात. मात्र ज्याने जिंकण्यासाठी प्रयत्न केला त्यांच काय?

नेमकी हिच दरी भरून काढण्याचा प्रयत्न दिग्दर्शक कबीर खान यांनी त्यांच्या फॉरगॉटन आर्मी, आझादी के लिऐ या वेब सीरिजमधून केलेला दिसतो. नेताजी सुभाषचंद्र बोस विविध कारणांमुळे इतिहासातही चर्चिले जात आहे आणि आजही त्यांच्या गुमनामी बाबाचं गूढ कायम आहे. महात्मा गांधींजीसोबत स्वातंत्र्य लढ्यात असताना त्यांनी स्वत:चा स्वतंत्र रस्ता निवडला. त्यांची हुशारी अफाट होती. स्वातंत्र मिळविण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेना, त्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण आणि महिलांनाही या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करुन घेण्यासाठी सुरू केलेली राणी झाशी रेजिमेंट देशातील पहिली महिला आर्मी ओळखली जाते.  

जानेवारी महिन्यात प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या फॉरगॉटन आर्मी या वेब सीरिजमध्ये आझाद हिंद सेनेच्या इतिहासात फारशा नोंदी नसलेल्या हिरोंच आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाच इपिसोडमध्ये १९४२ ते १९४५ पर्यंत कालखंड दाखविण्यात आला आहे. या सीरिजच्या पहिल्या मालिकेत आझाद हिंद सेनेच्या वयोवृद्ध जवानापासून होते. ज्या धर्तीवर स्वातंत्र्यासाठी लढला त्याच धर्तीवर तब्बल ४८ वर्षांनी तो दाखल होतो. आणि त्याच्या आठवणीतून आझाद हिंद सेनेच्या सुरुवातीचा कालखंड चितारला जातो. प्रचंड उर्जा, स्वातंत्र्याची ओढ आणि त्यासाठी तीव्र महत्वाकांक्षा असलेले सेनेचे तब्बल ५५ हजार जवान चलो दिल्लीचा नारा देतात. सुरुवातीला जपान सहकार्य करेल असे वाटत होतं. ब्रिटीशांच्या अनेक सैन्याना मारत ते पुढे जात असतात. मात्र शेवटी घात होतो. आणि त्यांचं चलो दिल्लीचं स्वप्न अपूर्ण राहतं.

आझाद हिंद सेनेविषयी – दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. १९४२ मध्ये सेनेची स्थापना झाली. सुभाषचंद्र बोस जानेवारी १९४१मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमध्ये असलेल्या रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापना केला. जय हिंद, चलो दिल्ली या घोषणेनुसार त्यांनी वाटचाल सुरू केली. १ ऑक्टोबर १९४३ मध्ये नेताजींनी आझाद हिंद सेनेचे तात्पुरते सरकार प्रस्थापित केल्याची घोषणा केली. त्यावेळी जपान, इटली व जर्मनी वैगरे राष्ट्रांनी तत्काळ त्यास औपचारिक मान्यताही दिली. या सेनेने ब्रिटिशांच्या अनेक टेकड्या जिंकल्या. मात्र २ मे १९४५ रोजी रंगून येथे जपानने शरणागती पत्करली. त्यादरम्यान नेताजी सिंगापूरहून विमानाने टोकियोला जात असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

लेखकाने कथेचा विषय सीमित ठेवला आहे. या वेब सीरिजमध्ये अधिकतर सेनेचे काम काज, त्यांना येणारी आव्हानं आदी गोष्टीभोवती फिरताना दिसतो. द्वितीय विश्वयुद्धादरम्यान जपानी सरकार इंग्रजांना आपला शत्रू आणि भारतींना मित्र मानत होते. यामध्ये दाखविल्यानुसार शत्रूचा शत्रू आपण मित्र या समीकरणानुसार महात्मा गांधी इंग्रजांविरोधात लढा देत असल्याने जपानी सैनिकांना गांधींबद्दल आदर होता. जपानी सरकारने भारतीयांना मदतीचं आश्वासन देतात. मात्र हीच परिस्थिती शेवटपर्यंत राहत नाही. अनेकदा त्यांच्यासमोर जगण्याचं आव्हान उभं राहतं. दोन काळामध्ये ही वेब सीरिज सुरू असते. या सीरिजचा मुख्य हिरो जवान असताना आणि त्यांच्या वृद्धापकाळातील अनुभव यात दाखविण्यात आला आहे.

या आझाद हिंद सेनेमध्ये एक प्रेम कथा दाखविण्यात आली आहे. आयुष्याचे ध्येय जरी स्वातंत्र्य असले तरी प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी प्रेमाचा आधार मिळतो, असं मानलं जातं. त्या आधारावर आझाद हिंद सेनेमध्ये एक प्रेम कथा फुलताना दिसते. यामध्ये त्याकाळातील महिलांची परिस्थिती त्यांच्यावर इग्रजांकडून होणारे अत्याचार आदी मुद्दयांना स्पर्श करण्यात आला आहे. तांत्रिक बाबींचा विचार करता या विषयाची भव्यता दाखविण्यात काही प्रमाणात दिग्दर्शकाला यश आलेलं आहे. यातील अनेक दृश्य तुमच्या लक्षात राहतील अशा स्वरुपाचे आहेत. अभिनयाच्या बाबतीत वेब सीरिज अपेक्षित उठून येत नाही. वेब सीजिर लहान असल्याने तुम्ही ती पूर्ण बघाल मात्र ती रंजकता शेवटपर्यंत राहत नाही. ऐतिहासिक बाबींवर फार लक्ष न देता आतापर्यंत इतिहासात फारशा न चर्चिलेल्या विषयांचा समावेश करण्याचा निर्मात्याचा प्रयत्न असण्याची शक्यता असावी. मात्र प्राईमच्या इतर वेब सीरिजच्या तुलनेत फॉरगॉटन आर्मी प्रेक्षकांवर फारशी छाप सोडू शकलेली नाही. यामध्ये सनी कौशल, शर्वरी वाघ, टीजे भानु, रोहित चौधरीसारखे चांगले कलाकार घेण्यात आले असले तरी मुळातच कथा फार दमदार नसल्याने आणि इतिहासाच्या छोट्या छोट्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने ही वेब सीरिज फारशी प्रभाव पाडू शकलेली नाही.