ऋषी कपूर यांच्याजागी दिसणार महानायक, ‘या’ चित्रपटात दीपिका झळकणार बिग बींबरोबर!

 ‘द इंटर्न’ हा हॉलिवूड चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अ‍ॅन हॅथवे आणि रॉबर्ट डी निरो मुख्य भूमिकेत झळकले होते.

  महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. वास्तविक, हे दोघेही ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी या चित्रपटात अभिनेते ऋषी कपूर झळकणार होते. परंतु, एप्रिल २०२० मध्ये त्यांचे निधन झाले. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांनी ‘पीकू’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘द इंटर्न’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबतच दीपिका पादुकोणने लिहिले की, ‘माझ्या सर्वात खास को-स्टारबरोबर पुन्हा काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी अमिताभ बच्चन यांचे इंटर्न अ‍ॅडॉप्शनमध्ये स्वागत करते.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

  ‘द इंटर्न’ हा हॉलिवूड चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अ‍ॅन हॅथवे आणि रॉबर्ट डी निरो मुख्य भूमिकेत झळकले होते. आता अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कॉर्पोरेट जगाच्या गर्दीत या दोघांमध्ये असलेले संबंध उत्तम प्रकारे दाखवले गेले आहेत.

  या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दीपिका अमिताभ बच्चनच्या बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे. थोडक्यात दीपिकाचा ‘द इंटर्न’ हा चित्रपट कामकाजाच्या भोवती फिरणार्‍या आयुष्यातील नात्यावर आणि जिव्हाळ्यावर आधारित चित्रपट आहे.