‘द कपिल शर्मा शो’ मधील प्रसिद्ध जोडी अडकली विवाह बंधनात, पाहा लग्नाचे सुंदर फोटो!

सुगंधाने नुकतीच तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केला आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासह, संकेतने एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती संकेतला व्हिडीओ कॉलद्वारे आपली मेहंदी दाखवत असल्याचे दिसून येत आहे.

    लग्न झालेल्या जोडप्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. हा फोटो त्यांच्या एका मैत्रिणीने प्रीती सिमोने शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र बसलेले दिसत आहेत.

    फोटोमध्ये सुगंधाने यलो ब्लाऊज आणि पिवळ्या रंगाचा लेहेंग्यासह गळ्यात सुंदर हार घातला आहे. त्याच वेळी, पांढऱ्या रंगाच्या पोशाखावर संकेतने पिवळ्या रंगाचे जाकीट परिधान केले आहे. हसताना दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

    सुगंधाने नुकतीच तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केला आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासह, संकेतने एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती संकेतला व्हिडीओ कॉलद्वारे आपली मेहंदी दाखवत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना संकेतने लिहिले- मेहंदी लगा कर रखना, सुगंधा मिश्रा.

    सुगंधा मिश्रा ही विनोदी कलाकार असण्याबरोबरच एक उत्तम गायिकाही आहे. तिने कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या दोघांसोबत काम केले आहे. सुगंधा आणि संकेत यांनीही बर्‍याच वेळा एकत्र काम केले आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये देखील ही जोडी एकत्र झळकली होती.