लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटJanuary, 01 1970

रकुलप्रीत सिंग आणि करिश्मा प्रकाश एनसीबी कार्यालयात दाखल, चौकशीला सुरुवात

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटरनवराष्ट्र.कॉम
13:08 PMSep 25, 2020

छापेमारीत दिग्दर्शक क्षितीज यांच्या घरात सापडले ड्रग्ज, चौकशी सुरु

धर्मा प्रोडक्शनचे संचालक क्षितीज प्रसाद यांच्या घरातून नारकोटिक्स ब्युरोने ड्रग्ज जप्त केली आहेत. एनसीबीची टीम आता त्याच्याकडे प्रश्न विचारत आहे. क्षितीज यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते, त्यानंतर एनसीबीची एक टीम सकाळी क्षितीजच्या घरी पोहोचली. तेथे छापा टाकून त्याच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आली. एनसीबी टीमने क्षितीजला अतिथीगृहात आणले आणि आता त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.

11:32 AMSep 25, 2020

रकुलप्रीत सिंग आणि करिश्मा प्रकाश एनसीबी कार्यालयात दाखल, चौकशीला सुरुवात

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो शुक्रवारी बॉलिवूड ड्रग लिंकमध्ये रकुलप्रीत सिंग यांची चौकशी करत आहे. रकुलप्रीत एनसीबी अतिथीगृहात पोहोचली आहे. त्यांच्यासमवेत दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि धर्मा प्रोडक्शनचे दिग्दर्शक क्षितीज प्रसाद यांचीही चौकशी केली जाणार आहे. एनसीबी प्रथम रकुलप्रीतची चौकशी करेल. गुरुवारी ती चौकशीसाठी येणार होता, परंतु रकुलप्रीतच्या टीमने सांगितले की, त्यांना समन्स मिळालेले नाहीत. त्यामुळे ती आता शुक्रवारी चौकशीसाठी पोहोचली आहे. दुपारी दीपिकाची मॅनेजर करिश्मा हिची विचारपूस केली जाणार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant singh rajput)  मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात (Drugs Connection) एनसीबीकडून अनेक खुलासे समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीने मुंबईतील तीन ठिकाणी धाडी टाकली होती. यामध्ये एनसीबीनं (NCB) केलेल्या कारवाईत ड्रग्ज सापडले होते. तसेच ड्रग्ज सेवनाचा मुद्दा समोर आला असून एनसीबीच्या तपासणीनंतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. तर बॉलिवूडमधून अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर या चौघांची नावे समोर आली आहेत.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने बॉलिवूडमधील पार्टी (Party) आणि ड्रग्जच्या सेवनाचा पर्दाफाश केला आहे. काही वर्षांपूर्वी केकेआरच्या (KKR) विजयाच्या पार्टीत क्रिकेटपटूंच्या पत्नी ड्रग्ज घेताना डोळ्याने पाहिले असल्याचा दावा शर्लिनने केला आहे. यामुळे बॉलिवूडपुरते ड्रग्ज कनेक्शन आता क्रिकेटपटूंपर्यंतही पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये शर्लिनने किंग खान शाहरूख खानचं नाव देखील घेतलं आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika padukone) आज शुक्रवारी एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार आहे. त्यामुळे काल दीपिका मुंबईत रवाना झाली होती. दीपिकाच्या चौकशीदरम्यान अभिनेता रणवीर सिंगही तिथे उपस्थित राहणार आहे. कंगना रणौतने सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या ड्रग्ज सेवनाबाबत खुलासा केला होता. त्यामुळे कंगनाला अटक होणार का? असा सवाल एनसीबीसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान, एनसीबीच्या धाडसत्राने आता सेलिब्रिटी धास्तावले असून अजून पन्नास अभिनेते आणि निर्माते एनसीबीच्या रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२९ गुरुवार
गुरुवार, ऑक्टोबर २९, २०२०

'Fake TRP' प्रकरणी पोलिसांनी वृत्तवाहिन्यांवर केलेली कारवाई योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement