Jacqueline Fernandez beauty tipas2

रोटी फाऊंडेशनच्या माध्यमातून भुकेलेल्यांना जेवण देण्याचं काम जॅकलीननं केलं आहे. यासोबतच डॅाक्टर आणि फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कार्य करणाऱ्यांच्या मदतीलाही ती धावून आली आहे.

    कोरोनाच्या महायुद्धात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सेलिब्रिटीही धावले आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील दयनीय परिस्थिती पाहून कलासक्त मन गहिवरलं असून, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदतीसाठी पुढे आलं आहे. यात श्रीलंकन मॅाडेल आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसनंही मोलाचं योगदान दिलं आहे.

    रोटी फाऊंडेशनच्या माध्यमातून भुकेलेल्यांना जेवण देण्याचं काम जॅकलीननं केलं आहे. यासोबतच डॅाक्टर आणि फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कार्य करणाऱ्यांच्या मदतीलाही ती धावून आली आहे. जॅकलीनचं हे कार्य कौतुकास्पद असल्याचं म्हणत पुणे पोलिसांनी तिचे आभार मानले आहेत. अशा प्रसंगी जो एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातो तोच खरा माणूस.

    या संकटसमयी जॅकलीननं माणूसकीचं एक नवं उदाहरण सेट केलं असून, ते इतरांनाही प्रेरणादायी ठरणारं आहे. कोणाची कौतुकाची थाप पाठीवर पडावी या आशेनं जॅकलीन सेवा करत नाही, पण काम करणाऱ्याचं कौतुक केलं की हुरूप येतो हे ओळखून पुणे पोलिसांनी तिचे आभार मानले आहेत.