The second wave of corona due to the closure of Rs 1.5 lakh received by the patient? Serious allegations against actress Jui Gadkari

ठाण्याचे जांभळी मार्केट आणि बेस्टच्या तुडुंब भरलेल्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट द्यायचा? असा सवालही जुईने उपस्थित केला आहे. प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?” असा गंभीर आरोप जुईने या पोस्टमध्ये केला आहे. कोव्हिड१९ निगेटिव्ह रिपोर्ट मॉलमध्ये प्रवेशासाठी बंधनकारक. आणि ठाण्याच्या जांभळीच्या मार्केटमध्ये जायला कोणता रिपोर्ट? बेस्टच्या तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट? परवाच कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होता. मग, ५० माणसांचा नियम कुठे गेला?” असे सवाल जुईने उपस्थित केले आहेत.

    मुंबई : मॉलमध्ये प्रवेशासाठी कोव्हिडचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयावरुन मराठी अभिनेत्री जुई गडकरीने (Marathi Actress Jui Gadkari) फेसबुक पोस्टच्या माध्यामातून आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी कोरोना खरचं आहे की.. रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्याने कोरोनाची दुसरी लाट? असे प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे.

    ठाण्याचे जांभळी मार्केट आणि बेस्टच्या तुडुंब भरलेल्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट द्यायचा? असा सवालही जुईने उपस्थित केला आहे. प्रत्येक रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?” असा गंभीर आरोप जुईने या पोस्टमध्ये केला आहे.
    कोव्हिड१९ निगेटिव्ह रिपोर्ट मॉलमध्ये प्रवेशासाठी बंधनकारक. आणि ठाण्याच्या जांभळीच्या मार्केटमध्ये जायला कोणता रिपोर्ट? बेस्टच्या तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट? परवाच कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जोरदार लग्न सुरु होता. मग, ५० माणसांचा नियम कुठे गेला?” असे सवाल जुईने उपस्थित केले आहेत.

    आजही काही मोठ्या युनिव्हर्सिटीज (पारुल युनिव्हर्सिटी) कॉन्व्होकेशन करत आहेत, यासाठी ४५०० जणांची गर्दी होतेय. नियम करताय तर सगळीगडे सारखे करा. मॉलमध्ये लोक निदान एकमेकांना चिकटून तरी बसत नाहीत. तरी टेस्ट कम्पलसरी आणि बेस्ट बसेसमध्ये जवळजवळ एकमेकांच्या मांडीत बसतात” असंही जुईने पोस्टमध्ये लिहिल आहे. तसेच तिने तिच्या एका मैत्रिणीला आलेला अनुभव देखील मांडला आहे.

    परवा माझ्या एका मैत्रिणीचा डिलीव्हरी आधी कोव्हिड रिपोर्ट केला आणि तो दुर्दैवाने पॉझिटिव्ह आला. तिचा सी सेक्शन करावं लागलं वेगळ्याच हॉस्पिटलला. कारण तिला ज्या हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरीसाठि नेलं होतं, त्यांनी तिला दाखल करण्यास नकार दिला. विनोदाची गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्ण असूनही तिला बाळाला स्तनपान करु दिलं. बाळ तिच्यापासून अवघ्या पाच फुटांवर ठेवलं होतं. ती असिम्पटमॅटिक होती. त्यांना भरमसाठ बिल भरावं लागलं.” अशी तक्रार जुईने फेसबुक पोस्टमधून मांडली आहे.

    “नक्की काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. कोरोना खरंच आहे की आता प्रत्येक रुग्णामागे दीड लाख मिळत होते, ते बंद झाले म्हणून ही दुसरी लाट आली आहे?” असा गंभीर सवालही जुईने उपस्थित केला आहे.

    Covid-19 -ve report compulsory for entering malls! Ani Thanyacha Jambhli cha market madhe jayla konta report?? Best cha…

    Posted by Jui Gadkari on Friday, 19 March 2021