टाइम्‍स नेटवर्क ‘टाइम्‍स नाऊ नवभारत एचडी’सह हिंदी न्‍यूज क्षेत्रात पदार्पण करण्‍यास सज्‍ज

हिंदी न्‍यूज क्षेत्रामध्‍ये धुमाकूळ निर्माण करण्‍याचे वचन देणारे टाइम्‍स नाऊ नवभारत (TIMES NOW नवभारत) त्‍याच्‍या प्रिमिअम व्हिज्‍युअल व साऊंड दर्जाच्‍या माध्‍यमातून बातम्‍या पाहण्‍याचा अनुभव द्विगुणित करते आणि चॅनेलचा वैविध्‍यपूर्ण लोगो व वैशिष्‍ट्यपूर्ण व्हिज्‍युअल ओळखीमधून प्रतिबिंबित होणाऱ्या त्‍याच्‍या चाणाक्ष, लक्षवेधक व धाडसी अवतारासह नाविन्‍यतेला सादर करते.

  मुंबई : टाइम्‍स नेटवर्क या भारताच्‍या प्रमुख प्रसारक नेटवर्कने आज हिंदी न्‍यूज चॅनेल टाइम्‍स नाऊ नवभारत (TIMES NOW नवभारत) १ ऑगस्‍ट २०२१ पासून एचडीमध्‍ये सुरू करण्‍यासोबत भारतीय भाषिक न्‍यूजक्षेत्रामध्‍ये प्रवेश करण्‍याची घोषणा केली. देशामध्‍ये बातम्‍या प्रसारणाच्‍या मूळ स्‍वरूपाला पुनर्परिभाषित केलेल्‍या भारताच्‍या सर्वात प्रभावी न्‍यूज नेटवर्कच्‍या वारसामधून उदयास आलेले टाइम्‍स नाऊ नवभारत (TIMES NOW नवभारत) ‘अब बदलेगा भारत, बनेगा नवभारत’ या तत्त्वासह न्‍यू इंडियासाठी सर्वसमावेशक घडामोडीच्‍या माध्‍यमातून नवीन व आवाज उठवण्‍याला चालना देणारे परिवर्तनात्‍मक चॅनेल असेल.

  हिंदी न्‍यूज क्षेत्रामध्‍ये धुमाकूळ निर्माण करण्‍याचे वचन देणारे टाइम्‍स नाऊ नवभारत (TIMES NOW नवभारत) त्‍याच्‍या प्रिमिअम व्हिज्‍युअल व साऊंड दर्जाच्‍या माध्‍यमातून बातम्‍या पाहण्‍याचा अनुभव द्विगुणित करते आणि चॅनेलचा वैविध्‍यपूर्ण लोगो व वैशिष्‍ट्यपूर्ण व्हिज्‍युअल ओळखीमधून प्रतिबिंबित होणाऱ्या त्‍याच्‍या चाणाक्ष, लक्षवेधक व धाडसी अवतारासह नाविन्‍यतेला सादर करते. प्रेक्षकांना फक्‍त ठळक बातम्‍या सांगण्‍यापेक्षा सविस्‍तर माहिती सांगण्‍याचा अविरत मनसुबा असलेले टाइम्‍स नाऊ नवभारत (TIMES NOW नवभारत) हा विश्‍वसनीय व निर्णायक कन्‍टेन्‍टद्वारे संचालित कृती-केंद्रित पत्रकारिताचा अद्वितीय ब्रॅण्‍ड आहे. बातम्‍यांच्‍या वास्‍तविक तत्त्वावर भर देणारे चॅनेल सर्वसमावेशक पत्रकारिता, सविस्‍तर व संतुलित विश्‍लेषण, प्रभावआणि संकल्‍पाला प्रेरित करणाऱ्या वृत्तीसह तथ्‍य-आधारित बातम्‍या सादर करत घटना-घडामोडींविरोधात आवाज उठविण्याचे कार्य करणार आहे.

  लोकप्रिय अँकर्स व प्रख्‍यात पत्रकार, तसेच प्रमुख संपादक म्‍हणून फायरब्रॅण्‍ड अँकर नाविका कुमार यांच्‍यासह हिंदी न्‍यूज क्षेत्रामध्‍ये यशस्‍वीरित्‍या पदार्पण करणारे टाइम्‍स नाऊ नवभारत (TIMES NOW नवभारत) सुशांत सिन्‍हा, पद्मजा जोशी, अंकित त्‍यागी व मिनाक्षी कंदवाल अशा पॉवरहाऊस अँकर्सचे सूत्रसंचालन असलेले ७ प्राइम-टाइम शोज सादर करणार आहे.

  बातम्‍या सांगण्‍याच्‍या रूढीबद्ध पद्धतीला मोडून काढत चॅनेल परस्‍परसंवादात्‍मक व नाविन्‍यपूर्ण पद्धतीने बातम्‍या सांगणार आहे, जे लोकांवर परिणाम करणाऱ्या समस्‍यांवर लक्ष केंद्रित करतात आणि सोल्‍युशन-केंद्रित चर्चांच्‍या माध्‍यमातून बातम्‍यांचे सविस्‍तर व निर्णायक विश्‍लेषण सादर करतात. प्राइम-टाइम शोज आहेत सायंकाळी ५ वाजता ‘राष्‍ट्रवाद’, सायंकाळी ६ वाजता ‘लोगतंत्र’, सायंकाळी ७ वाजता ‘धाकड एक्‍सक्‍लुसिव्‍ह’, रात्री ८ वाजता ‘सवाल पब्लिक का’, रात्री ९ वाजता ‘न्‍यूज की पाठशाला’ आणि रात्री १० वाजता ‘ओपिनियन इंडिया’.

  या लाँचबाबत बोलताना टाइम्‍स नेटवर्कचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी एमके आनंद म्‍हणाले, ”आम्‍ही प्रवेश केल्‍यापासून आमचा प्रमुख ब्रॅण्‍ड टाइम्‍स नाऊसह इंग्रजी न्‍यूज विभागावर प्रभुत्‍व गाजवले आहे. आम्‍हाला आता आमच्‍या पहिल्‍याच हिंदी न्‍यूज चॅनेलसह भारतीय भाषिक न्‍यूज क्षेत्रामध्‍ये पदार्पण करण्‍याचा आनंद होत आहे. टाइम्‍स नाऊ नवभारतच्‍या (TIMES NOW नवभारत) माध्‍यमातून आम्‍ही परिवर्तनाला चालना देणाऱ्या बातम्‍या सादर करण्‍याच्‍या मूलभूत कटिबद्धतेवर लक्ष केंद्रित केलेल्‍या प्रबळ तत्त्वासह धुमाकूळ निर्माण करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहोत. आम्‍ही कन्‍टेन्‍ट तत्त्वाचे पालन करतो, ज्‍याचा रेटिंग्‍जला प्राधान्‍य न देता सामाजिक परिणामावर फोकस आहे. मला विश्‍वास आहे की, टाइम्‍स नाऊ काही सर्वोत्तम मीडिया ब्रॅण्‍ड्सनी सेवा वाहिलेल्‍या हिंदी न्‍यूज प्रसारण क्षेत्रामध्‍ये अधिक सुधारणा करण्‍याप्रती योगदान देईल.”

  या उल्‍लेखनीय लाँचसोबत नेटवर्कने हिंदी भाषिक बाजारपेठांमध्‍ये लक्षवेधक विपणन मोहिम राबवण्‍याची योजना आखली आहे. मॅककॅन वर्ल्‍डग्रुप इंडिया यांची संकल्‍पना असलेले चॅनेल त्‍यांच्‍या जाहिरातीचे अनावरण करेल. या जाहिरातीची संकल्‍पना देखील मॅककॅन वर्ल्‍डग्रुप इंडियानेच मांडली आहे, ज्‍यामधून चॅनेलची निर्मिती आणि प्रतिष्ठित प्रसून जोशी यांनी रचलेले ब्रॅण्‍ड तत्त्व दिसून येते.

  टीव्‍ही, आऊटडोअर, प्रिंट, रेडिओ, मल्‍टीप्‍लेक्‍सेस, सोशल मीडिया व आघाडीच्‍या डिजिटल व्‍यासपीठांवर मोठ्या प्रमाणात नियोजन करण्‍यात आलेल्‍या प्रमोशनसह नेटवर्कने त्‍यांच्‍या हिंदी न्‍यूज चॅनेलच्‍या (TIMES NOW नवभारत) सादरीकरणासाठी कोणतीच कसर सोडलेली नाही. चॅनेल व त्‍यांच्‍या प्रमुख सपांदकांच्‍या अद्वितीय प्रदर्शनासह नेटवर्कचे आऊटडोअर प्रमोशन १९ शहरांमधील ४०० हून अधिक ठिकाणी करण्‍यात आले आहे, ज्‍यामध्‍ये मुंबई, दिल्‍ली, लखनौ, पटणा, जयपूर, डेहरादून, इंदौर, पंजाब, रायपूर व वाराणसी या शहरांचा समावेश आहे. नेटवर्क देशाच्‍या आघाडीच्‍या हिंदी व इंग्रजी दैनिकांमध्‍ये त्‍यांच्‍या प्रिंट ॲड्स (जाहिराती) प्रकाशित करण्‍यास देखील सज्‍ज आहे.

  देशाच्‍या अव्‍वल जाहिरातदारांची निष्‍ठा व पाठबळ प्राप्‍त करत टाइम्‍स नाऊ नवभारतने (TIMES NOW नवभारत) केण्‍ट आरओ सिस्टिम, सेन्‍चुरी प्‍लाय, रेडिको खैतान, वेदांता, मेडिबडी, अमृता विश्‍वविद्यापीठम, डार्विन प्‍लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीज, मायलॅब डिस्‍कव्‍हरी सोल्‍युशन्‍स, मेघदूत हर्बल, किर्लोस्‍कर ब्रदर्स यांच्‍यासोबत सहयोग केला आहे.

  टाइम्‍स नाऊ नवभारत (TIMES NOW नवभारत) सर्व आघाडीचे केबल ऑपरेटर्स, एमएसओ व डीटीएच व्‍यासपीठांवर उपलब्‍ध असेल.

  The Times Network is all set to make its Hindi news debut with Times Now Navbharat HD