‘लक्ष्मी बॉम्ब’चे शीर्षक बदलले, ‘या’ महिन्यात होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

चित्रपटरसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तो अक्षय कुमार अभिनेता 'लक्ष्मी बॉम्ब' (Lakshmi Bomb) हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच (Poster Released) याची जोरदार चर्चा असून 'कंचना २' या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.

चित्रपटरसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तो अक्षय कुमार अभिनेता ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Lakshmi Bomb) हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच (Poster Released) याची जोरदार चर्चा असून ‘कंचना २’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून लक्ष्मी बॉम्ब चित्रपट अडचणींच्या घेऱ्यात सापडला होता. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे राष्ट्रीय हिंदू सेनेने म्हटले होते. त्यामुळे चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी जोर धरू लागली होती. आता लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून चित्रपटाचे ‘लक्ष्मी’ एवढेच ठेवण्यात आले आहे. अक्षय कुमार व कियारा अडवाणी यांच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

अक्षय यात एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी हिंदू सेनेने लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांच्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. तसेच, आम्ही सांगितलेले बदल केले नाही तर हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही’. असा इशारादेखील हिंदू सेनेने दिला होता.