चार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला, जवळपास ११ महिने चोरांनी तो जपून ठेवला कारण…

१९७७ साली ८८ व्या वर्षी चार्ली चॅप्लिन यांचं निधन झालं. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा मृतदेह चोरीला गेला होता. काही चोरट्यांनी कबर खणून त्यांचा मृतदेह चोरला.

    चार्ली चॅप्लिन हे सर्वाधिक लोकप्रिय विनोदवीरांपैकी एक म्हणून ओळखले जातात. शब्दांशिवाय चित्रपट किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिन. अगदी पु.ल.देशपांडेंपासून प्रल्हाद केशव अत्रेंपर्यंत विनोदी साहित्याची निर्मिती करणाऱ्या प्रत्येकानं चार्ली यांना आपलं प्रेरणास्थान मानलं.  चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या या विनोदवीराची आज १३२ वी जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या मृतदेह चोरीचा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

    १९७७ साली ८८ व्या वर्षी चार्ली चॅप्लिन यांचं निधन झालं. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा मृतदेह चोरीला गेला होता. काही चोरट्यांनी कबर खणून त्यांचा मृतदेह चोरला. पैश्यासाठी ही विचित्र चोरी करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी या चोरांना अटक केली. विशेष म्हणजे चोरांनी तब्बल ११ महिेने मृतदेह आहे त्याच स्थितीत सांभाळून ठेवला होता.

    लवकरच चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यावर एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाची निर्मिती चार्लीची नात कार्मन चॅप्लिन करणार आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. परंतु कोरोनामुळं शूटिंग लांबणीवर गेलं आहे. या चित्रपटाचे नाव ‘चार्ली चॅप्लिन: अ मॅन ऑफ द वर्ल्ड’ असे आहे. हा एक डॉक्युमेंट्री प्रकारातील चित्रपट आहे. यामध्ये त्यांचे पडद्यामागचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले जातील. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांच्या मृतदेह चोरीचा किस्सा देखील दाखवला जाणार आहे.