अखेर प्रतिक्षा संपली! मिर्झापूर वेब सीरिजच्या दुसरा सीझनचा व्हिडिओ प्रदर्शित…

मिर्झापूरचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर शोच्या दुसऱ्या सीझनची झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आणि प्रेम पाहायला मिळत आहे.

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘मिर्झापूर’ या शोची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. या शोचा पहिला सीझन खूप लोकप्रिय झाला आहे. तसेच या शोच्या पहिल्या सीझनला ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप पसंती मिळाली आहे. त्याचसोबतच आता मिर्झापूरचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर शोच्या दुसऱ्या सीझनची झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आणि प्रेम पाहायला मिळत आहे.

या प्रदर्शित केलेल्या व्हिडिओमध्ये मिर्झापूरची एक झलक दाखवण्यात आली आहे. तसेच निर्मात्यांनी आपल्या संकल्पनेनुसार लोकांचे पर्सनल मॅसेज, कॉमेंट्स, आणि ट्विट्स या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून कशाप्रकारे या व्हिडिओला आणि शोला प्रतिसाद मिळत आहे, हे समजतं.

या व्हिडिओच्या शेवटी त्यांनी “जल्द मिलेंगे, बहुत हुआ इंतज़ार” असे सांगितलें आहे. त्यामुळे जणू काही, या संदेशातून मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनचा इशारा देत आहेत. मात्र या शोच्या पहिल्या सीझननंतर दुसरा सीझन कधी येणार ? याबाबत प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु ‘मिर्झापूर सीझन २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता या व्हिडिओद्वारे दर्शवली जात आहे.