ott platform

उद्या ४ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन नवीन चित्रपट आणि २ वेबसीरीज प्रदर्शित होत आहेत.

सध्या चित्रपट निर्मात्यांनी ओटीटीची वाट धरलीये. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. आता चित्रपटगृहांचा काही प्रमाणात परवानगी दिली असली तरी अनेक चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. उद्या ४ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन नवीन चित्रपट आणि २ वेबसीरीज प्रदर्शित होत आहेत.

bhaag beanie bhaag

१. भाग बेनी भाग

अभिनेत्री स्वरा भास्करची भाग बेनी भाग ही वेब सीरिज ४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

darbaan

२. दरबान

रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या कथेवर आधारीत चित्रपट दरबान उद्या झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शरद केळकर, रसिका दुगल आणि शारिब हाशमी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

sons of the soil

३. सन्स ऑफ द सॉयल

प्रो कब्बडी लीग मुळे कबड्डी या खेळात अमुलाग्र बदल झाला आहे. या लीगमुळे आज कबड्डी खेळाला ग्लॅमर मिळालं आहे. कबड्डीदेखील क्रिकेट आणि फुटबॉलप्रमाणेच एक ग्लॅमरस खेळ म्हणून ओळखला जातो. ‘जयपूर पिंक पँथर’ ही टीम प्रो कब्बडी लीगची पहिली विजेता ठरली होती. या टीमचा विजयाचा प्रवास ‘द सन्स ऑफ सॉईल’ या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

bomby roj

४. बॉम्बे रोज

नेटफ्लिकचा पहिला अॅनिमेटेड भारतीय चित्रपट बॉम्बे रोज उद्या प्रदर्शित होणार आहे.

monk

५. मंक

मंक हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.