”कहने को हमसफर है”  वेबसीरिजच्या निमित्ताने एकता कपूरने आयोजित केला पहिला डिजिटल कॉन्सर्ट ”ओ मेरे हमसफर”

एकता कपूर 'कहने को हमसफ़र है' मालिकेचा तिसरा भाग घेऊन येत आहे. मालिकेत दाखवण्यात आलेल्या लग्न, नातेसंबंध, प्रेम याला दर्शकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आता 'कहने को हमसफ़र है'च्या आगामी तिसऱ्या

 एकता कपूर ‘कहने को हमसफ़र है’ मालिकेचा तिसरा भाग घेऊन येत आहे. मालिकेत दाखवण्यात आलेल्या लग्न, नातेसंबंध, प्रेम याला दर्शकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आता ‘कहने को हमसफ़र है’च्या आगामी तिसऱ्या भागाची दर्शक आतुरतेने वाट पाहात असून तो अल्ट बालाजी आणि ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर ६ जूनला दुपारी १२ पासून प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी, दर्शकांना एक अनोखा यूट्यूब प्रीमियर ‘ओ मेरे हमसफर’ पाहायला मिळाले.  ऑल्ट बालाजी आणि झी ५ ची सीरीज ‘कहने को हमसफ़र है’ च्या स्टार कास्ट सोबत एक डिजिटल म्युजिक कॉन्सर्ट करण्यात आला आहे.

‘ओ मेरे हमसफर’ चे प्रीमियर २६ मे ला संध्याकाळी ५ वाजता ऑल्ट बालाजीच्या यूट्यूब पेजवर सादर झाले. या यूट्यूब प्रीमियरचे यजमानपद भूषवले आहे. गायक, टेलीविजन एंकर आणि ऑल इंडिया रेडियो, एफएम रेनबो रेडियो जॉकी, मिहिर जोशी. या अनोख्या यूट्यूब प्रीमियरची सुरुवात आधीच्या दोन सीजनच्या प्रवासाने झाली, जो लोकांच्या मनात ‘कहने को हमसफर हैं’ च्या जुन्या आठवणी ताज्या करणारा होता. 
 
याविषयी बोलताना, एकता कपूर ने सांगितले की, ओ मेरे हमसफर एक अनोखा प्रीमियर असून ‘कहने को हमसफर हैं’ च्या संगीतमय आहे.
ज्यात शोमधील कलाकारांसोबत अभिजीत सावंत, ऐश्वर्या मजुमदार आणि प्रतिभा सिंह यांच्यासारखे प्रसिद्ध पार्श्वगायकां द्वारे लोकप्रिय गाण्यांचे सुंदर प्रदर्शन आहे. हा संगीतमय प्रवास निश्चितच दर्शकांसाठी एक चांगला अनुभव असेल.
 
प्रेक्षकांसाठी इंडियन आयडॉल फेम आणि बहुमुखी प्रतिभावान गायक अभिजीत सावंत, प्रतिभा सिंह बघेल आणि छोटे उस्ताद संगीत रियलिटी शोची विजेती ऐश्वर्या मजमुदार यांच्या द्वारे शो ला मंत्रमुग्ध करणारा जादुई म्यूजिकल परफॉर्मन्स यात आहे. सर्वच कलाकार सोशल मीडिया आणि यूट्यूब वरचे प्रचंड लोकप्रिय असून हे सांगण्याची आवश्यकता नाहीये की त्यांचे उत्साही चाहते निश्चित रूपाने ‘कहने को हमसफ़र हैं’ च्या लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरणाने ऐकण्यासाठी उत्सुक आहेत.
 
या यूट्यूब प्रीमियरमध्ये शोचे कलाकार रोनित रॉय, गुरदीप पुंज, मोना सिंह, अपूर्वा अग्निहोत्री, पलक जैन आणि पूजा बनर्जी यांच्यासोबत रोचक गप्पागोष्टी देखील ऐकायला मिळतील. लॉकडाऊनमध्ये, शोच्या कलाकारांनी आपापल्या घरात सुरक्षित राहून वीडियो रिकॉर्ड केले असून हा एक विशेष प्रीमियर घेऊन आले आहोत जो ‘कहने को हमसफर है’ च्या प्रति त्यांचे प्रेम आणि विश्वास दाखवतो.