rohit pawar

अल्पावधीत लोकप्रिय झालेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा येता सोमवार- मंगळारचा भाग बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत. कारण या भागात महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. येत्या १४ आणि १६ डिसेंबरला हे भाग प्रसारीत होतील.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

भाजपा नेत्या पंकजा मुंडे, भाजपा खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार थुकरटवाडीत येणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

चला हवा येऊ द्या’ या मालिकेतील ‘पत्रास कारण की..’ हा भाग लोकांना प्रचंड आवडतो. एखादा विषय किंवा व्यक्ती घेऊन पत्र लिहिलं जातं. त्या पत्राचं वाचन पोस्टमनकाकांच्या भूमिकेतील विनोदवीर सागर कारंडे करतो. या भागात ‘पोस्टमन काका’ सागर कारंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यांचं दुःख सांगणारं पत्र सादर केलं आणि ते पत्र ऐकताना रोहित पवारांचे डोळे पाणावले. या पत्राला हे तीनही नेते काय उत्तर देणार हे प्रेक्षकांना कार्यक्रमात पाहायला मिळेल.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)