सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने गाठला ५०० भागांचा पल्ला, अनु सिध्दार्थला देणार एक खास सरप्राईझ !

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. अनु आणि सिध्दार्थ सोबत ते हसले, रडले त्यांना भरपूर आशिर्वाद देखील दिले. आता मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही.

मुंबई : रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. अनु आणि सिध्दार्थ सोबत ते हसले, रडले त्यांना भरपूर आशिर्वाद देखील दिले. आता मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही. मालिकेतील सगळ्या कलाकारांनी, मालिकेच्या संपूर्ण यूनिटने हा क्षण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला. केक कट केला, सेल्फी देखील काढला.
सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टिंसिन्ग आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर ५०० भागांचा हा क्षण उत्साहात साजरा केला गेला. मालिकेमध्ये सिध्दार्थला अनु आणि घरच्या सदस्यांकडून एक खास सरप्राईझ मिळणार आहे. अनु – सिध्दार्थच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल घरामध्ये मोठ सेलिब्रेशन देखील होणार आहे, ज्याची कल्पना सिद्धार्थला नाहीये. तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मना बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. तत्ववादी कुटुंबात अजून एका सदस्याची एंट्री झाली आहे आणि ती म्हणजे सम्राट तत्ववादी. सम्राटने अनु – सिद्धार्थ आणि संपूर्ण तत्ववादी कुटुंबाला एक धक्का दिला जेंव्हा त्याने सान्वीला घरामध्ये बायको म्हणून आणले. सान्वी बदलली आहे यावर मात्र अनु – सिद्धार्थच्या मुळीच विश्वास नाही. सान्वी आणि सम्राटच्या येण्याने आता मालिकेमध्ये पुढे काय बघायला मिळणार आहे ? सान्वी बदली आहे का ? कुठली नवी खेळी ती खेळणार आहे ? अनु – सिद्धार्थ तिच्यावर पुन्हा विश्वास ठेऊ शकतील ? हे बघणे रंजक असणार आहे
तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मना बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.