महेश मांजरेकर यांना ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी

अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेज पाठवण्यात आला आहे. अशी माहिती मिळाली आहे. अबू सालेम या टोळीकडून महेश मांजरेकय यांना धमकीचा मेसेज आला आहे. या प्रकरणी महेश मांजरे कर यांनी मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. अंडरवर्ल्डच्या नावे महेश मांजरेकर यांना ३५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे.

अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेज पाठवण्यात आला आहे. अशी माहिती मिळाली आहे. अबू सालेम या टोळीकडून महेश मांजरेकय यांना धमकीचा मेसेज आला आहे. या प्रकरणी महेश मांजरे कर यांनी मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

तसेच या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. रत्नागिरीतील खेड येथील ३२ वर्षाच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.